पोलीस असल्याचे भासवून महिलेस लुबाडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:22 IST2020-12-22T04:22:17+5:302020-12-22T04:22:17+5:30
तरटगाव (ता. करमाळा) येथून ही महिला करमाळा येथील बँक ऑफ इंडिया व तलाठी कार्यालयात असल्याने ती महिला एकटीच आली ...

पोलीस असल्याचे भासवून महिलेस लुबाडले!
तरटगाव (ता. करमाळा) येथून ही महिला करमाळा येथील बँक ऑफ इंडिया व तलाठी कार्यालयात असल्याने ती महिला एकटीच आली होती. कामे आटोपून परत जाताना एस. टी. ला उशीर असल्याने किराणा सामान घ्यावे म्हणून एस टी स्टँड ते भवानी नाका या रोडने चालत जात असताना तिच्यासमोर मोटार सायकलला काठी अडकवून आलेला अनोळखी इसम आला. त्याने आपण पोलीस असल्याची बतावणी करीत मास्क का लावला नाही, आमचे मोठे साहेब पुढे लाल दिव्याच्या गाडीमध्ये थांबले आहेत. तुम्ही माझ्यासोबत गाडीवर बसा, नाही तर तुम्हाला अटक करीन, असे म्हणाल्याने महिला त्याच्या गाडीवर बसली. त्या अनोळखी इसमाने छुप्या मार्गाने पुणे रोडने रोसेवाडी गावाचे पुढे असलेल्या कचरा डेपोजवळ नेऊन दमदाटी केली. पाकिटातील दोन हजार रुपये काढून घेतले. मारहाण करून कानातील कर्णफुले चोरुन पलायन केले.
याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.