आमच्या झाडाचे नारळ का घेतले म्हणून महिलेची तिघांकडून धुलाई

By विलास जळकोटकर | Updated: May 30, 2023 19:12 IST2023-05-30T19:11:47+5:302023-05-30T19:12:04+5:30

कोण कधी कोणत्या कारणावरुन भांडणं करतील याचा नेम नाही.

Woman washed by three for taking coconut from our tree | आमच्या झाडाचे नारळ का घेतले म्हणून महिलेची तिघांकडून धुलाई

आमच्या झाडाचे नारळ का घेतले म्हणून महिलेची तिघांकडून धुलाई

सोलापूर : कोण कधी कोणत्या कारणावरुन भांडणं करतील याचा नेम नाही. विजापूर नाका झोपडपट्टी २ येथे झाडाचे नारळ घेतल्यावरुन एका महिलेला तिघींनी मिळून लाथाबुक्क्यानी मारहाण करुन जखमी केले. मंगळवारी (दि ३०) सकाळी ९:३० च्या सुमारास राहत्या घरी ही घटना घडली. शबाना महेबूब सौदागर (वय- ४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. विजापूर नाका झोपट्टी नं. २ मध्ये जखमी शबाना सौदागर या राहतात. 

परिसरातच राहणाऱ्या मैनू शेख, सुगराबी शेख व त्यांची सून या तिघांनी आमच्या झाडाचे नारळ का घेतथले म्हणून विचारणा करीत लाथाबुक्यांनी चोप दिला. या मारहाणीत शबाना यांच्या सर्वांगास मुका मार लागला. उपचारासाठी जखमीचा जावई वसीम यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.
 

Web Title: Woman washed by three for taking coconut from our tree