मासे विक्रीसाठी बसण्याच्या ठिकाणावरून महिलेवर वार! तिघांवर गुन्हा दाखल
By रवींद्र देशमुख | Updated: August 11, 2023 17:04 IST2023-08-11T17:04:03+5:302023-08-11T17:04:27+5:30
घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

मासे विक्रीसाठी बसण्याच्या ठिकाणावरून महिलेवर वार! तिघांवर गुन्हा दाखल
रवींद्र देशमुख, सोलापूर : मंगळवार बाजार येथे मासे विक्री करण्याच्या बसण्याच्या ठिकाणावरून महिलेवर सत्तुरने वार केल्याने महिला जखमी झाली आहे. या प्रकरणी शेखर अर्जुन जगताप ( वय ३४, रा. कौतम चौक) यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी जगताप हे मंगळवारी दुपारी मासे विक्री करण्यासाठी मंगळवार बाजारातील नेहमीच्या ठिकाणी गेल्या असता तेथे आरोपी रेखा बादल गायकवाड ही तेथे मासे विक्री करिता बसली होती. तेव्हा फिर्यादी तेथे गेल्यानंतर आरोपीने फिर्यादीला वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी तिला समजावून सांगताना फिर्यादीचे मासे रस्त्यावर टाकले. शिवाय आरोपीने फिर्यादीवर सत्तुरने वार केले. तर आरोपी बादल गायकवाड व त्यांची मुलगी यांनी फिर्यादीच्या आईला मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी वरील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पैकेकरी करत आहेत.