महिलेसह चौघांना दिवसाढवळ्या लुटले नरखेड शिवारात तीन लाख ७५ हजार चोरले
By Admin | Updated: May 9, 2014 00:33 IST2014-05-08T18:37:38+5:302014-05-09T00:33:25+5:30
मोहोळ : मित्राच्या आजारी असलेल्या आईला पाहायला आलेल्या एक महिलेसह चौघांना दिवसाढवळ्या लुटल्याची घटना नरखेड शिवारात बुधवार, दि. सात मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या लुटमारीत तीन लाख ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

महिलेसह चौघांना दिवसाढवळ्या लुटले नरखेड शिवारात तीन लाख ७५ हजार चोरले
मोहोळ : मित्राच्या आजारी असलेल्या आईला पाहायला आलेल्या एक महिलेसह चौघांना दिवसाढवळ्या लुटल्याची घटना नरखेड शिवारात बुधवार, दि. सात मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या लुटमारीत तीन लाख ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
मीरा व्यंकटेश प्रभू (रा. ताबूत लक्ष्मीनगर, पुणे) हे आपले सहकारी गोविंद पाटील यांच्यासह एमव्हीएल ६४७८ सेडम येथे (कर्नाटक) निघाले होते. मोहोळ येथे आल्यानंतर गाडीचा चालक आमरे याच्या मित्राला भेटण्यासाठी नरखेडला जात असताना वाटेत थांबले असता अचानक आठ ते दहा अज्ञात चोरट्यांनी हातात काठ्या, गज घेऊन या सर्व लोकांवर हल्ला केला.
जबरदस्त मारहाण केल्यानंतर मीरा प्रभू यांच्या हातातील बांगड्या, कानातील फुले, रोख रक्कम असा तीन लाख ७५ हजारांचा ऐवज लुटून नेला. याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात मीरा प्रभू यांनी दरोड्याची फिर्याद दाखल केली आहे. या दिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या दरोड्याचा पुढील तपास एपीआय जितेंद्र शहाणे हे करीत आहेत.