महिला हॉस्पिटलमध्ये प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:21 IST2021-03-25T04:21:58+5:302021-03-25T04:21:58+5:30
आशंका संभाजी भुसे (माहेरकडील नाव, वय २१, रा. घरनिकी, ता. मंगळवेढा) असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक ...

महिला हॉस्पिटलमध्ये प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू
आशंका संभाजी भुसे (माहेरकडील नाव, वय २१, रा. घरनिकी, ता. मंगळवेढा) असे मयत महिलेचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत महिलेचे तिसऱ्यावेळी गरोदरपणाचे ९ महिने ७ दिवस पूर्ण झालेले होते. तिला प्रसुती वेदना सुरू झाल्याने तिची आई मालन संभाजी भुसे यांनी मंगळवेढा येथील महिला हॉस्पिटलमध्ये २३ मार्च रोजी साडेपाच वाजता दाखल केले. सदर महिलेची प्रसूती मध्यरात्री १२ वाजून ८ मिनीटांनी नॉर्मल झाली. मात्र तिला अगोदरपासूनच रक्तदाबाचा त्रास होता. प्रसूतीनंतर तीचा रक्तदाब वाढल्याने तीला त्रास जाणवू लागला. तिचे अचानक ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊ लागले. रक्तदाब व हृदयाचे ठोके कमी झाल्याने शर्थीचे प्रयत्न करूनही बुधवारी मध्यरात्री १.५० मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल बामणे करीत आहेत.