दागिने चोरीतील महिलेने जामिनावर सुटताच केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:21 IST2021-04-17T04:21:59+5:302021-04-17T04:21:59+5:30

वैराग : जामगाव (ता. बार्शी) येथे लग्न जमविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेने कुटुंबप्रमुख आजारी असल्याचा गैरफायदा उचलत सोने पळविल्याचा प्रकार ...

Woman commits suicide after stealing jewelery | दागिने चोरीतील महिलेने जामिनावर सुटताच केली आत्महत्या

दागिने चोरीतील महिलेने जामिनावर सुटताच केली आत्महत्या

वैराग : जामगाव (ता. बार्शी) येथे लग्न जमविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलेने कुटुंबप्रमुख आजारी असल्याचा गैरफायदा उचलत सोने पळविल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणात न्यायालयाकडून जामीन मिळताच आरोपी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

लताबाई लक्ष्मण हिंगे (वय ४७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून जामगाव (ता. बार्शी) येथे शुक्रवारी साडेनऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

काही दिवसांपूर्वी लग्न जमविण्यासाठी मध्यस्थी करीत लताबाईने दागिने पळविल्याच्या आरोपाखाली वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. वैराग पोलिसांनी तपास करून तीन दिवसांत तीन लाखांचे दागिने हस्तगत केले हाेते. दरम्यान, जामिनावर सुटका होताच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तिचा पुतण्या तानाजी हिंगे यांनी वैराग पोलिसात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मयत अशी नोंद केली आहे.

Web Title: Woman commits suicide after stealing jewelery