तक्रार मागे घ्या म्हणून शिवीगाळ, दोघाविरुद्ध ॲट्रॉसिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:26 IST2021-08-12T04:26:42+5:302021-08-12T04:26:42+5:30

माढा तालुक्यातील अकोले येथे ही घटना २ ऑगस्ट रोजी घडली आहे. याबाबतची फिर्याद पौर्णिमा राजू बनसोडे यांनी ३ ऑगस्ट ...

Withdrawal of the complaint as abusive, atrocity against both | तक्रार मागे घ्या म्हणून शिवीगाळ, दोघाविरुद्ध ॲट्रॉसिटी

तक्रार मागे घ्या म्हणून शिवीगाळ, दोघाविरुद्ध ॲट्रॉसिटी

माढा तालुक्यातील अकोले येथे ही घटना २ ऑगस्ट रोजी घडली आहे. याबाबतची फिर्याद पौर्णिमा राजू बनसोडे यांनी ३ ऑगस्ट रोजी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दीड महिन्यापूर्वी देलेली तक्रार मागे घ्यावी २ ऑगस्ट रोजी सचिन बबनराव पाटील व आकाश बबनराव पाटील या दोघा पाटील बंधूंनी चारचाकी गाडीतून रात्री आठच्या सुमारास पौर्णिमा बनसोडे यांच्या घरासमोर जाऊन सचिन पाटील यांनी हातात तलवार, तर आकाश पाटील यांनी हातात कोयता घेऊन तुझा नवरा कोठे आहे? त्याला जिवंत सोडणार नाही असे धमकावून जातीवाचक शिवीगाळ केली होती. याबाबतची फिर्याद पौर्णिमा बनसोडे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिली होती. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. विशाल हिरे हे करीत आहेत.

----

Web Title: Withdrawal of the complaint as abusive, atrocity against both