शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप जिंकण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील २६ गावे सरसावली

By appasaheb.patil | Updated: April 24, 2019 13:21 IST

सध्याची पाण्याची टंचाई पाहता गावकºयांनी श्रमदानातून पाणी अडविण्याची कामे सुरू केली आहेत.

ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यातील जवळपास २६ गावांमध्ये श्रमदानातून कामे सुरू सध्याची पाण्याची टंचाई पाहता गावकºयांनी श्रमदानातून पाणी अडविण्याची कामे सुरू केली सध्या टँकर सुरू असलेल्या कौठाळी, बीबीदारफळ व मार्डी गावात श्रमदानासाठी युवक पुढे येत नाहीत.

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप जिंकण्यासाठी २६ गावे सरसावली असून श्रमदानाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. शोषखड्डे, सीसीटी, नालाबांध, गाळ काढण्याची कामे गावोगावी सुरू आहेत.

वॉटर कप स्पर्धेसाठीचे हे उत्तर तालुक्याचे तिसरे वर्ष असून, या वर्षी वॉटर कप स्पर्धेत भाग घेणाºया गावांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी जवळपास १८ गावांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला होता. यावर्षी हीच संख्या २६ इतकी झाली आहे. भागाईवाडी, कळमण, वांगी, पडसाळी, गावडीदारफळ, वडाळा, रानमसले, साखरेवाडी, नान्नज, अकोलेकाटी, कोंडी, गुळवंची, बाणेगाव, भोगाव, होनसळ, राळेरास, एकरुख, नरोटेवाटी, खेड, हिरज, कवठे, डोणगाव, नंदूर-समशापूर आदी गावात श्रमदानातून विविध कामे सुरू आहेत. बीबीदारफळ या गावातही श्रमदानाला सुरुवात झाली आहे. ८ एप्रिल रोजी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली असली तरी लोकसभा निवडणुकीनंतर कामाला अधिक वेग येईल, असे सांगण्यात आले. 

पाऊस कमी पडल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याने शोषखड्डे खोदण्यावर भर देण्यात आला आहे. रानमसले, नान्नज, वांगी या गावात शोषखड्डे घेण्यात आले आहेत. रानमसलेच्या महिलांनी वॉटर कपचे काम चांगलेच मनावर घेतले असल्याचे दिसत आहे. कळमण गावातही मोठ्या जिद्दीने काम सुरू आहे. शोषखड्डे, सीसीटी खोदण्याची कामे सुरू असून, काही गावात तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे तसेच ओढ्याच्या खोदाईची कामेही हाती घेतली  आहेत. 

कौठाळी, मार्डी अन् बीबीदारफळ..- उत्तर सोलापूर तालुक्यात ४० गावे व ३६ ग्रामपंचायती असून, सीना नदीकाठालगत पाच गावे आहेत. या गावातील नागरिकांना सीना नदी व उजनी कालव्याचे पाणी मिळत असल्याने श्रमदानासाठी कोणी पुढाकार घेत नाही. सध्या टँकर सुरू असलेल्या कौठाळी, बीबीदारफळ व मार्डी गावात श्रमदानासाठी युवक पुढे येत नाहीत. रानमसले, वांगी, कळमण ही गावे यावर्षी मोठ्या जिद्दीने श्रमदानात सहभागी झाली आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील जवळपास २६ गावांमध्ये श्रमदानातून कामे सुरू असून, अन्य काही गावांचाही सहभाग होत आहे. सध्याची पाण्याची टंचाई पाहता गावकºयांनी श्रमदानातून पाणी अडविण्याची कामे सुरू केली आहेत.- आशिष शिरगिरे, समन्वयक, पाणी फाउंडेशन, उत्तर तालुका

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाdroughtदुष्काळWaterपाणीwater shortageपाणीटंचाई