मोबाईलसाठी पत्नीने खाल्ल्या जास्त प्रमाणात औषधी गोळ्या
By रूपेश हेळवे | Updated: April 12, 2023 13:08 IST2023-04-12T13:07:49+5:302023-04-12T13:08:10+5:30
मला नवीन मोबाईल घेऊन द्या, असा पत्नीने धरला हट्ट

मोबाईलसाठी पत्नीने खाल्ल्या जास्त प्रमाणात औषधी गोळ्या
रूपेश हेळवे, सोलापूर : नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी पत्नीने जास्त प्रमाणात औषधी गोळ्या खाल्ल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावात सोमवारी रात्री घडली. निंबव्वा निंगदळी ( वय ३८, रा. मैंदर्गी ) असे त्या महिलेचे नाव आहे.
सोमवारी रात्री राहत्या घरात पत्नीने मला नवीन मोबाईल घेऊन द्या असे नवऱ्याला म्हंटले. नवऱ्याने आठ ते दहा दिवसात नवीन मोबाईल घेऊन देतो असे म्हटले. तेव्हा पत्नीने रागाच्या भरात घरात शिल्लक असलेल्या सर्दी ताप खोकल्याच्या ३० ते ४० गोळ्या एकदम खाल्ल्या. याचा त्रास होऊ लागल्याने तिला अक्कलकोट येथील सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करून रेफरने छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.