गुळसडीत पती व मुलादेखत कडाडणारी वीज पडून पत्नी ठार
By काशिनाथ वाघमारे | Updated: June 4, 2023 19:53 IST2023-06-04T19:53:22+5:302023-06-04T19:53:29+5:30
सोलापूर : करमाळा तालुक्यातील गुळसडी येथे वादळी वा-यात कडाडत खाली आलेली वीज अंगार कोसळून महिला ठार झाली. पती व ...

गुळसडीत पती व मुलादेखत कडाडणारी वीज पडून पत्नी ठार
सोलापूर : करमाळा तालुक्यातील गुळसडी येथे वादळी वा-यात कडाडत खाली आलेली वीज अंगार कोसळून महिला ठार झाली. पती व मुलादेखत तिच्या अंगावर ही वीज कोसळली. कमल सुभाष अडसुळ (वय ४५) असे मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
करमाळा शहर व तालुक्यात देवळाली, साडे, गुळसडी या गावांमध्ये रविवार, ४ जून रोजी दुपारी पाऊस झाला. दरम्यान तत्पवूर्वी अडीच वाजण्याच्या सुमारास गुळसडी येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यात अडसूळ वस्ती येथे पाऊस झाला. शेतात काम करत असताना पाऊस सुरु झाला. कमलचे पती आणि मुलगा हे बैलगाडीतून घरी येत होते तर कमल या पावसात भीजत गाडीमागे चालत निघालेल्या होत्या.
घरापासून काही अंतरावर असताना कडाडत अंगावर वीज कोसळली. या दुर्देवी घटनेत त्या जागेवरच मरण पावल्या. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली व पती असा परिवार आहे. या घटनेनंतर त्यांना खासगी वाहनातून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय अडसूळ यांच्या त्या चुलत भावजय होत.