कुत्रं शेतात का सोडलं म्हणून दिराकडून; भावजयीला लाथाबुक्क्यानं मारहाण

By विलास जळकोटकर | Updated: June 12, 2023 16:23 IST2023-06-12T16:23:43+5:302023-06-12T16:23:53+5:30

सोलापूर : ‘तुमचं कुत्रं आमच्या रानात का सोडलं’ म्हणून दिरानं भावजयीला काठीनं आणि लाथाबुक्क्यानं मारहाण करुन जखमी केले. सारोळे ...

Why did the dogs leave the field? Beating brother-in-law with kicks | कुत्रं शेतात का सोडलं म्हणून दिराकडून; भावजयीला लाथाबुक्क्यानं मारहाण

कुत्रं शेतात का सोडलं म्हणून दिराकडून; भावजयीला लाथाबुक्क्यानं मारहाण

सोलापूर : ‘तुमचं कुत्रं आमच्या रानात का सोडलं’ म्हणून दिरानं भावजयीला काठीनं आणि लाथाबुक्क्यानं मारहाण करुन जखमी केले. सारोळे (ता. मोहोळ) येथे रविवारी सायंक़ाळी ७ च्या सुमारास राहत्या घरी ही घटना घडली. माधुरी उमेश मुळे (वय- ३५, रा. सारोळे) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. 

यातील जखमी माधुरी मुळे व दीर रामचंद्र हणमंत मुळे यांचे शेजारी घर आहे. शेतही लगत आहे. माधुरी मुळे यांचे कुत्रे दिराच्या शेतात येत असल्याचे चिडून रामचंद्र याने रविवारी रात्री ७ च्या सुमारास ‘कुत्र्याला आमच्या शेतात सोडू नका म्हणून सुनावले. यामध्ये शाब्दिद वाद झाला यात रागाच्या भरामध्ये रामचंद्र याने भावजय माधुरी यांना काठीने आणि लाथाबुक्क्यानं मारहार केली. यात त्यांच्या सर्वांगास मुका मार लागला.  जखमी अवस्थेत मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन सोमवारी सकाळी ११ वाजता पती उमेश यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल, केले आहे. सिव्हील पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. 

Web Title: Why did the dogs leave the field? Beating brother-in-law with kicks