पंढरपुरात बाजी कोण मारणार?, मतमोजणीला सुरुवात; निकालाची उत्सुकता शिंगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 08:04 IST2021-05-02T08:02:31+5:302021-05-02T08:04:21+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपुरात बाजी कोण मारणार?, मतमोजणीला सुरुवात; निकालाची उत्सुकता शिंगेला
सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज मतमोजणीचा दिवस आहे. कोविड स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त १४ टेबलच मांडण्यात आली आहेत.
पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून भालके यांचे पुत्र नशीब आजमावत आहेत तर भाजपकडून समाधान अवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले होते. ही निवडणूक सत्ताधारी आणि दोघांसाठीही प्रतिष्ठेची आहे.