कुजबुज - मामा, शेवटी तुम्ही बबनदादांचं भाऊंच की !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:02+5:302021-07-19T04:16:02+5:30

--- दक्षिण सोलापूर ...शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाची बैठक बोलावलेली. बैठक दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ ...

Whispers - Mama, in the end you are Babandada's brother! | कुजबुज - मामा, शेवटी तुम्ही बबनदादांचं भाऊंच की !

कुजबुज - मामा, शेवटी तुम्ही बबनदादांचं भाऊंच की !

---

दक्षिण सोलापूर ...शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाची बैठक बोलावलेली. बैठक दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ आणि वडापूर बंधाऱ्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी. इतर लोकप्रतिनिधीही बैठकीला आलेले. अधिकाऱ्यांनी विषय मांडला चर्चा सुरू होताच माजी आमदार राजन पाटील यांनी भीमा-सीना - भोगावती नद्यावरील को.प. बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचा मुद्दा मांडला. चर्चा सुरू झाली मध्येच आमदार संजयमामा शिंदे मंत्र्यांच्या कानात कुजबुजले.

राजन पाटील बेचैन अहो मामा, आमचं होऊ द्या. मंत्री जयंत पाटलांचे लक्ष राजन मालकांकडं तर कान संजयमामाकडं. राजन पाटील अस्वस्थच. पुन्हा पुन्हा मंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरूच होता. राजन मालकांनी साद घातली मामा, तुम्हाला मुंबईत वेळ असतो की राव ! आम्हाला बोलू द्या. संजयमामांचं तरीही दुर्लक्ष. साहेब, आमच्या बोफले बंधाऱ्याचं तेवढं बघा. मंत्र्यांचं साफ दुर्लक्षच, कंटाळून राजन पाटील म्हणाले, शेवटी मामा तुम्ही बबनदादांचं भाऊंच आहात. तुमचं काम झाल्याशिवाय तुम्ही शेपूट सोडणारच नाही.

Web Title: Whispers - Mama, in the end you are Babandada's brother!