गाडीमध्ये ऊस भरताना तरुणाच्या छातीवर चढून सापानं मारला डंख
By विलास जळकोटकर | Updated: July 17, 2023 18:30 IST2023-07-17T18:30:41+5:302023-07-17T18:30:53+5:30
उमेश सुभाष राठोड असे या जखमीचे नाव आहे.

गाडीमध्ये ऊस भरताना तरुणाच्या छातीवर चढून सापानं मारला डंख
सोलापूर : सापाला नुसतं दुरुन जरी पाहिलं तर पोटात धडकी भरते. इथं तर गाडीमध्ये ऊस भरत असताना अचानकपणे ऊसाच्या मोळीतून नागराज प्रकटला आणि तरुणाच्या छातीला कडकडून डंख मारला. उमेश सुभाष राठोड असे या जखमीचे नाव आहे. त्याला सोमवारी सोलापूरच्या ३ासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
यातील जखमी तरुण उमेश सुभाष राठोड हा मुळचा तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग गावचा आहे. ८ जुलैपासून तो कर्नाटकातील (हळीनरसापूर जि. हसन) येथे गेला होता. गाडीमध्ये ऊस भरत असताना ऊसाच्या पेंडक्याबरोबरच साप गुंडाळून आला. ऊसाची पेंडी गाडीत भरत असताना सापानं त्याच्या छातीला कडकडून चावा घेतला. त्याच्यावर उपचार करुन पुढील उपचारासाठी जखमीचा भाऊ महेश याने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.