शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत बसमध्ये चढताना गंठण हिसकावून पळाला, गस्तीवरील पथकाने दोन तासात छडा लावला

By काशिनाथ वाघमारे | Updated: November 11, 2023 16:48 IST

ही घटना बार्शी बस स्थानकावर शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

सोलापूर : दिवाळीसाठी कोल्हापूर येथून माहेरी निघालेली महिला बार्शी बस स्थानकावर उतरून पाथरूड या एसटीत पिशव्या घेऊन चढत असताना तिच्या गळ्यातील ९० हजारांचे सोन्याचे गंठन चोरट्यांनी लांबविले. माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुद्देमालासह चोरट्याला ताब्यात घेतले. ही घटना बार्शी बस स्थानकावर शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

याबाबत सुलभा कवीश्वर सांगळे (रा. निजाम जवळा, ता. भूम, जि. धाराशिव, हल्ली जरगनगर, कोल्हापूर) या महिलेने फिर्याद दिली आहे.चोरीच्या प्रकारानंतर वालवड (ता.भूम) येथे माहेरी जाऊन वडील आणि व भावास घेऊन बार्शीतील शहर पोलीस ठाणे गाठले. रात्री ११ वाजता फिर्याद नोंदवून घेत पोलिसांनी तपास सुरू केला.दरम्यान शहर पोलीस रात्री गस्त घालत असताना शिवाजी कॉलेजच्या आवारात एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी शंकर सायबू जाधव ( रा.सुमित्रानगर अकलूज, हल्ली मंगरूळ ता.घनसांघवी जि. जालना) या संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी करता ९० हजारांचे गंठण काढून दिले.

फिर्यादी महिला सुलभा सांगळे या शुक्रवारी सायंकाळी दिवाळीसाठी त्या कोल्हापूर येथून एस. टी. ने बार्शी बस स्थानपकावर आल्या. वालवड येथे जाण्यासाठी बार्शी - पाथरूड या बसमध्ये चढताना गर्दीत संशयिताने त्यांना धक्का देऊन गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण हिसकावत होतो. सुलभा यांनी विरोध केला. पुन्हा धक्का देवुन गंठण घेऊन तो गेटमधून पळून गेला.

अंगझडतीत गंठण दिले काढून

याबाबत गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हयातील वर्णना प्रमाणे संशयित व्यक्ती शिवाजी कॉलेज परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक ढेरे, उपनिरीक्षक गळगटे, हवालदार अमोल माने, कॉन्स्टेबल पवार, उदार यांनी त्याला ताब्यात घेतले. चाैकशीत नाव, गाव सांगतच त्याची अंगझडती घेतली अन ९० हजारांचे गंठण काढून दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीThiefचोर