शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर चालवताना डुलकी लागली अन् कान तुटला; तांदुळवाडीजवळील अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 13:26 IST

सोलापूर : वाहन चालवताना कधी कधी जीवावर बेतू शकते याचं प्रत्यंतर मंगळवारी पहाटे एका ट्रॅक्टर चालकाला आले. ऊस घेऊन ...

ठळक मुद्दे- दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या तांदुळवाडीजवळ झाला अपघात- जखमी रूग्णांवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू- ऊस वाहतुक करणाºया ट्रकवर घडली घटना

सोलापूर : वाहन चालवताना कधी कधी जीवावर बेतू शकते याचं प्रत्यंतर मंगळवारी पहाटे एका ट्रॅक्टर चालकाला आले. ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टचालकाला पहाटेच्या गार वाºयाने अवचित डुलकी लागली अन् चक्क चालत्या वाहनावरुन खाली पडून तो जखमी झाला. यात त्याचा डावा कान तुटला. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या तांदुळवाडीजवळ पहाटे साडेचार वाजता ही घटना घडली. त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

सध्या साखर कारखान्यांचा हंगोम सुरु असल्यानं जिल्ह्यात सर्वत्र फडामध्ये ऊसतोड सुरु आहे. बैलगाड्यांपासून ट्रक, ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक सुरु आहे. मंगरुळ (ता. तुळजापूर) येथील शेतकºयाकडे ऊसतोड सुरु होती. सोमवारी दिवससभर तोडलेल्या ऊस फडात पडला होता. भल्या पहाटेच टोळीतील मजूर जागे झाले. त्यांनी ट्रॅक्टरमध्ये ऊस भरला आणि चालक विलास विनायक राठोडने (वय- ३०, रा. परळी, जि. बीड) याने बोचºया थंडीत स्टेअरींग पकडले आणि मंगरुळमार्गे अक्कलकोट तालुक्यातील गोकूळ शुगर कारखान्याकडे निघाला.

धोत्रीकडे जात असताना तांदुळवाडीजवळ गार वाºयाने ट्रक्टर चालवतानाच त्याला अचानक डुलकी लागली अन् चालत्या वाहनातून खाली पडला. तशातूनही खडबडून उठून  चालत्या ट्रॅक्टरचा ताबा घेतला. तो बंद करुन रस्त्याच्या कडेला लावला. रस्त्याच्या बाजूने तो पडल्याने त्याच्या डाव्या हाताला, डोक्याला दुखापत झाली असून कान तुटला आहे. चालकाचा मित्र गंगाराम कसबे याने जखमी विलास याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात