शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
2
मराठी सिंधी म्हणजे वडापाव- दाल पकवान एकत्र; उल्हासनगर शहर विकासासाठी निधी देणार - एकनाथ शिंदे
3
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
4
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
5
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
6
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
7
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
8
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
9
यो यो हनी सिंगच्या 'त्या' कृतीनंतर हरमनप्रीतसह स्मृतीही गोंधळली; व्हिडिओ व्हायरल
10
"मी जर तोंड उघडलं तर संपूर्ण देश..."; बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
11
अमेरिकेच्या अरेरावीला सडेतोड उत्तर ! रशिया-चीन-इराणचा समुद्रात एकत्रित नौदल युद्धाभ्यास
12
'सरपंच साब'वर पुन्हा अन्याय नको... तिलक वर्माच्या जागी श्रेयस अय्यरलाच टीम इंडियात संधी मिळायला हवी!
13
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
14
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
15
दुचाकी वाचवायला गेला आणि तीन जणांचा जीव गेला, ट्रक अपघाताचा थरकाप उडणारा सीसीटीव्ही व्हिडीओ
16
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
अंकिता भंडारी हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे, उत्तराखंड सरकारचा निर्णय  
18
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
19
विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनांची कंटेनरला धडक: ठाण्यात विचित्र अपघातात चाैघे जखमी, १२ वाहनांचे नुकसान
20
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
Daily Top 2Weekly Top 5

हिरनी जब शेरनी बन जाती है...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 10:50 IST

८० या दशकातील आजची कोर्ट स्टोरी. सांगोल्याचे सामाजिक भावनेने वकिली करणारे अ‍ॅड. उदयबापू घोंगडे पक्षकारांबरोबर सकाळी सकाळी आॅफिसला आले. ...

ठळक मुद्दे८० या दशकातील आजची कोर्ट स्टोरीहिरनीभी कभी कभी शेरनी हो जाती है......

८० या दशकातील आजची कोर्ट स्टोरी. सांगोल्याचे सामाजिक भावनेने वकिली करणारे अ‍ॅड. उदयबापू घोंगडे पक्षकारांबरोबर सकाळी सकाळी आॅफिसला आले. कागदपत्रे माझ्यासमोर ठेवली. कागदपत्रे पाहता दिसून आले की, सुधाकरला खुनाच्या आरोपावरुन अटक झालेली होती. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्याला काठीने बेदम मारहाण करुन घरात बांधून ठेवले व त्यातच त्याचा मृत्यू झाला असा खुनाचा आरोप होता.

खटला शिक्षेचा होता. कारण सुधाकरच्या घरातच मृत व्यक्ती बांधलेल्या अवस्थेत सापडली होती. चोरी करायला आला असताना मारहाण केली असा खबरी जबाब सुधाकरनेच दिला होता. या दोन्ही गोष्टींमुळे केसमधून सुटण्याचा काही मार्ग दिसत नव्हता. सुधाकरची पत्नी साक्षीदार होती. ती नेत्र साक्षीदार म्हणून पोलिसांनी तिचा जबाब घेतलेला होता. कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास केला असताना माझे अंतर्मन सांगत होते की, खरा प्रकार काहीतरी वेगळाच असला पाहिजे. मयताला झालेल्या सर्व जखमा डोक्यावर समोरच्या बाजूला झालेल्या होत्या. केमिकल अ‍ॅनालायझरच्या रिपोर्टवरुन दिसून येत होते की, सुधाकरच्या जप्त केलेल्या कपड्यावर रक्ताचा एकही थेंब नव्हता. परंतु सुधाकरच्या पत्नीच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते. मयताच्या फक्त शर्टावर रक्ताचे डाग होते. पायजम्यावर रक्ताचा एकही थेंब नव्हता. सुधाकरने हजर केलेल्या काठीवर रक्ताचा एकही थेंब नव्हता़ परंतु घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेल्या वरवंट्यावर मयताचे रक्त होते.

यथावकाश खटला सुनावणीसाठी उभा राहिला. माझे अंतर्मन मला सांगत होते की, खरा प्रकार वेगळाच असला पाहिजे. सुधाकर घटनास्थळी नसलाच पाहिजे. घटनास्थळी फक्त मयत व सुधाकरची बायको हे दोघेच असले पाहिजेत़ मयतास काठीने मारहाण झालेली नाही. त्याच्या डोक्यावर झालेल्या जखमा वरवंट्यानेच झालेल्या आहेत. एक गोष्ट मला प्रकर्षाने खटकत होती ती म्हणजे, सुधाकरची बायको काही बोलत नसे. सारखी हरिणीसारखी बावरलेली असे. शुन्यात नजर लावून बसलेली असे. तारखेच्या दिवशी सुधाकरच्या बायकोशिवाय सर्वांना आॅफिसच्या बाहेर जाण्यास सांगितले. तिला खरे काय ते सांग असे दरडावून विचारले. दहा मिनिटे ती शुन्यातच बघत होती. नंतर तिने जे सांगितले ते फारच भयानक होते. त्या दिवशी तिचा नवरा रात्री शेतात मुक्कामाला होता. घरात फक्त ती व तिचे लहान लेकरु होते. मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजा ठोठावण्यात आला.

तिला वाटले, नवराच आला, म्हणून तिने दरवाजा उघडला. तर समोर मयत उभा. त्याने पिण्यास पाणी मागितले. ती पाणी आणण्यास स्वयंपाक घरात गेली. हा पाठोपाठ गेला. तिला खाली पाडले, तिची अब्रू घेण्याचा प्रयत्न केला. जीवाच्या आकांताने तिने प्रतिकार केला. तिच्या हातात वरवंटा लागला. तिने तो वरवंटा प्राणपणाने शक्ती लावून त्याच्या डोक्यात मारला. त्याची मिठी ढिली पडली. तिने आपली अब्रू वाचवली होती. रात्रभर ती घरी रडत बसली. उगवतीच्या सुमारास तिचा नवरा आला. त्याला बघताच ती ढसाढसा रडू लागली. तिने सर्व हकिकत सांगितली. खरी हकिकत जर सर्वांना सांगितली तर विनाकारण नाही ती चर्चा होईल व अब्रूचे खोबरे हाईल म्हणून मयत हा चोरी करण्यासाठी घरात घुसला. त्यामुळे त्यास मी काठीने मारले अशी खबर सुधाकरने दिली व खुनाचा आरोप स्वत:वर घेतला. महात्मा गांधींचा सत्याचा प्रयोग न्यायालयात सादर करण्याचा निर्णय मी घेतला.

त्या बाईना जसे प्रत्यक्षात घडले तसा जबाब न्यायालयात द्या असे सांगितले. न्यायालयात सुधाकरच्या बायकोने घडले तसे सांगितले. अब्रू वाचवण्यासाठी मीच स्वसंरक्षणार्थ त्या नीच माणसाला वरवंटा मारुन खलास केले अशी कबुली दिली. न्यायालयात हजर असलेले सर्वजण अवाक् झाले. नवºयाऐवजी बायकोच आता जन्मठेपेला जाईल असे सर्वांचे मत पडले. न्यायालयात युक्तिवादात आम्ही असे निदर्शनास आणून दिले की, एखाद्या महिलेच्या अब्रूवर घाला पडत असेल तर त्या परिस्थितीत त्या महिलेला स्वसंरक्षणार्थ त्या व्यक्तीला ठार मारण्याचा अधिकार इं. पि. को. १०० प्रमाणे पूर्णपणे अधिकार त्या महिलेस आहे. सुधाकरच्या बायकोने केलेले कृत्य हा गुन्हाच होत नाही. सुधाकरची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जेलमधून सुटल्यावर सुधाकर, त्याची बायको व इतर नातेवाईक पेढे घेऊन भेटण्यास आले. पहिल्या दिवशी हरिणीसारखी बावरलेली व घाबरलेली सुधाकरची बायको त्या दिवशी शेरणीसारखी दिसत होती.हिरनीभी कभी कभी शेरनी हो जाती है......-अ‍ॅड. धनंजय माने.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयPoliceपोलिस