शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सीईओ दिलीप स्वामी यांनी होटगी शाळेला अचानक भेट दिल्यावर काय घडलं; वाचा बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 09:16 IST

सोलापूर जिल्ह्यातील १०० शाळेवर शिक्षण परिषद होणार; सीईओनी काढले आदेश

सोलापूर: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी होटगीच्या मराठी प्राथमिक शाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा सुरू आहे याची अचानक तपासणी केली. यावेळी शिक्षकांची धावपळ उडाली अन् पहिलीतील मुलीने सांगितलेल्या गोष्टीवरून सीईओ स्वामी आनंदित झाले आणि इतर शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी  शनिवारपासून केंद्रप्रमुख कार्यालयात शैक्षणिक परिषद आयोजन करण्याचे आदेश दिले. 

कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होटगी प्राथमिक आरोग्य केंद्रात आले होते. हा कार्यक्रम झाल्यावर दोघांनी थेट जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. शाळेचा परिसर व शिक्षक करीत असलेल्या कामांची त्यांनी तपासणी केली. कोरोना काळात सुरू असलेल्या आॅनलाईन व आॅफलाईन अभ्यासाची माहिती शिक्षकांनी दिली. या अभ्यास पद्धतीचा विद्यार्थ्यांना खरोखरच फायदा होत आहे काय हे तपासण्यासाठी काही विद्यार्थी व पालकांना बोलावून आणण्यास त्यांनी सांगितले. तिसरीतील संजना बनसोडे हिने चिमणी व कावळ्याची गोष्ट सांगितली तर साक्षी सोनकडे व वर्षा बनगोंडे यांनी कविता म्हणून दाखविल्या.

पालक मल्लिकार्जुन बनगोंडे यांनाही सीईओनी काही प्रश्न विचारले. लॉकडाऊनकाळात मुलांना शाळा दुरावली. त्यानंतर आॅनलाईन व इतर माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षणाबाबत मुलं व पालक समाधानी आहेत का याची त्यांनी माहिती घेतली. आॅनलाईनद्वारे शिष्यवृत्तीची तयारी करणाºया चौथीतील वैशाली ढंगे हिच्याशी सीईओ स्वामी यांनी संवाद साधला.यावेळी शिक्षक वैशाली कुलकर्णी, सुनीता वनस्कर, शोभा चव्हाण, स्वाती स्वामी उपस्थित होते.

जिल्ह्यात १00 ठिकाणी परिषद

शैक्षणिक गुणवत्ता विकास व इतर विषयावर चर्चा व आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील १00 केंद्रावर शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी व विभागप्रमुखांनी या कार्यशाळेत हजेरी लावून मार्गदर्शन करावे असे परिपत्र सीईओ स्वामी यांनी जारी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSchoolशाळाEducationशिक्षण