What do you say Corona commits suicide by strangling frightened married woman | काय सांगता; कोरोनाला घाबरून विवाहित महिलेची गळफास घेऊन केली आत्महत्या

काय सांगता; कोरोनाला घाबरून विवाहित महिलेची गळफास घेऊन केली आत्महत्या

सोलापूर : कोरोनाला घाबरून विजापूर रोडवरील मंत्री चांडक रेसिडेन्सी येथील राहत्या घरी विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडला.

रेखाराणी अमर मुंडे (३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. रेखाराणी यांचे पती अमर मुंडे यांना कोरोना झाला होता. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून पंधरा दिवसांनंतर ते घरी आले होते. त्यानंतर त्यांच्या मावस भावाला कोरोना झाला होता. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भावांना डबा देण्यासाठी अमर मुंडे दवाखान्यात जात होते. यापूर्वीच अमर मुंडे यांना कोरोना झाला होता, त्यामुळे पुन्हा तुम्ही डबा द्यायला जाऊ नका, असं रेखाराणी अमर मुंडे यांना वारंवार सांगत होती.

सोमवारी रात्री अमर मुंडे हे घरी आले. तेव्हा दोघा पती-पत्नींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. अमर मुंडे यांनी तू भिऊ नको. उद्या तुला गावाकडे पाठवतो असे म्हणाले आणि घराच्या बाहेर येऊन बसले. तेव्हा रेखाराणी यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच पती अमर मुंडे व शेजारच्या लोकांनी त्यांना खाली उतरून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

Web Title: What do you say Corona commits suicide by strangling frightened married woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.