बचत गटाच्या वसुलीला गेला अन् जमावाकडून चोप खाल्ला
By विलास जळकोटकर | Updated: March 25, 2023 15:28 IST2023-03-25T15:27:47+5:302023-03-25T15:28:20+5:30
सोलापूर : लघुद्योगासाठी आर्थिक पुरवठा करण्यासाठी बँका, पतसंस्था, बचत गट गावोगावी कार्यरत आहेत. सोलापुरात अशाच एका बचत गटातून दिलेल्या ...

बचत गटाच्या वसुलीला गेला अन् जमावाकडून चोप खाल्ला
सोलापूर : लघुद्योगासाठी आर्थिक पुरवठा करण्यासाठी बँका, पतसंस्था, बचत गट गावोगावी कार्यरत आहेत. सोलापुरात अशाच एका बचत गटातून दिलेल्या पैशाची वसुली करण्यासाठी गेलेल्या तरुणाला आठ-ते दहाजणांच्या जमावाकडून बेदम चोप खावा लागला. अक्षय गोविंद बिराजदार (वय- ३०, रा. रेणुकानगर, जुळे सोलापूर) असे जखमी तरुणाचं नाव आहे. त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
यातील जखमी अक्षय बिराजदार हा तरुण शुक्रवारच्या सायंकाळी लष्कर, सरस्वती चौक परिसरात बचत गटातून घेतलेले पैसे वसुली करण्यासाठी गेला होता. त्यांनी पैशाची मागणी केली. यावरुन बाचाबाची झाली. ८ ते १० जणांच्या जमावाकडून लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली. यात त्याच्या सर्वांगास मुका मार लागला. या प्रकाराची माहिती कळताच जखमीचा मित्र अविनाश राठोड घटनास्थळी धावला. रात्री पावणेनऊच्या सुमारास शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.