शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Maharashtra Election 2019: ...तर पवाराची औलाद सांगणार नाही- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 17:37 IST

राष्ट्रवादीनं माळशिरस या मतदारसंघातून उत्तम जानकरांना उमेदवारी दिली आहे.

सोलापूरः राष्ट्रवादीनं माळशिरस या मतदारसंघातून उत्तम जानकरांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासाठी अजित पवारांनी प्रचारसभा घेतली आहे. यावेळी अजितदादांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजितदादा म्हणाले, मी जे बोलतो ते करतो, वचनपूर्तीचं राजकारण करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. याची जाणीव माळशिरसकरांनो डोळ्यांसमोर ठेवा. तसेच आम्हाला सत्ता द्या, पहिल्या तीन महिन्यांच्या आत नाय तुमचा सातबारा कोरा केला, तर पवाराची औलाद सांगणार नाही, असंही अजित पवार म्हणाले आहेत.  तीन तीन वर्षं कर्जमाफी यांच्या काकांनी केली होती काय?, हिरवी यादी, पिवळी यादी आणि लाल यादी, पिवळी झाली तरी हिरवी यादी येत नाही. मीसुद्धा संस्था चालवलेल्या आहेत, हे सरकार शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे देत नाही. गेल्या पाच वर्षांत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात हे या सरकारचं पाप नाही काय?, शेतकरी आत्महत्या का करतो, त्यांच्या धान्याला भाव नाही. त्यांच्या भाजीपाल्याला भाव नाही. त्यांच्या फळांना भाव नाही. त्याला मदत होत नाही.यांना पिकांवर रोग कुठला पडतो तेच कळत नाही, त्यांना शेतीतलंच काही कळत नाही, ते मदत कसली करणार?, असं म्हणत अजित पवारांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं. तसेच कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा हवाला देत अजित पवार म्हणाले, अरे तुम्ही माणसांना मारायला निघालात, एवढी नशा आणि धुंदी आली आहे काय?, जनता एखाद्याला निवडून देते, त्याला पाडायचंही धारिष्ट्य ही जनता दाखवू शकते, याचा विसर राज्यकर्त्यांना पडला आहे. 

सोलापूर जिल्हा बँकेची अवस्थाही बिकट आहे. ज्यांनी चुका केल्या त्यांच्यावर पांघरून घालायचं आणि विरोधात असलेल्यांना त्रास देण्याचं काम करायचं, या प्रकारचं काम सत्ताधाऱ्याचं चाललंय. मुंबईत आरेमध्ये एका रात्रीत कितीतरी झाडंच कापून टाकली आणि त्यातच शिवसेना म्हणते आम्ही बघून घेऊ. तिथे वाट लागली आणि हे म्हणतात आम्ही बघून घेऊ. किती दिवस खिशात त्यांचे राजीनामे होते, त्यांचं काहीएक ऐकलं जात नाही. नुसतंच बघून घेतो, बघून घेतो सांगतायत. एवढीच धमक होती तर सरकार पाडायचं होतं ना?, त्या नगरच्या खासदारानं सांगितलं कमळाचं बटन दाबणार तरच दोन हजार रुपये घ्या, ते दोन हजार काय त्या खासदाराच्या बापाच्या घरचे आहेत काय, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केलाय. सत्तेचा माज कुठेतरी उतरवला पाहिजे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019malshiras-acमाळशिरस