शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला जातीयवादी म्हणणारे आमच्या पंगतीत जेवून गेले; रावसाहेब दानवे यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 12:26 IST

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शरद पवार, मायावती, अब्दुल्ला यांना टोला

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाºयांचा मेळावा येथील हेरीटेज गार्डनमध्ये झालाजे आम्हाला जातीयवादी म्हणतात त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे. ते आमच्या पंगतीत जेवून गेले - दानवे

सोलापूर : भाजपा आणि शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप मायावती, शरद पवार आणि फारुक अब्दुल्ला करतात. पण ही मंडळी मागील काळात आमच्या पाठिंब्याबर सत्तेत होती. जे आम्हाला जातीयवादी म्हणतात त्यांच्या तोंडाला खरकट लागलं आहे. ते आमच्या पंगतीत जेवून गेले आहेत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लगावला. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाºयांचा मेळावा येथील हेरीटेज गार्डनमध्ये झाला, यावेळी ते बोलत होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिवसेना नेत्या नीलम गोºहे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत, भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, महापौर शोभा बनशेट्टी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार प्रशांत परिचारक, ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख महेश कोठे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी आमदार नरसिंग मेंगजी, भाजपाच्या प्रदेश चिटणीस उमा खापरे, सभागृह नेते संजय कोळी, पुरुषोत्तम बरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, मोहिनी पत्की, हेमंत पिंगळे आदी उपस्थित होते. 

दानवे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते विकासकामांवर मते मागू शकत नाहीत. त्यांच्यात तेवढी हिंमत नाही. काही लोक भाजपा-सेनेला जातीयवादी म्हणतात. त्यातील शरद पवार आमच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. मायावती आमच्या काळात मंत्री होत्या, तर फारुक अब्दुल्ला यांच्यासोबत आमची युती झाली होती. आम्हाला जातीयवादी म्हणणाºयांची तोंडं खरकटी आहेत. मागील निवडणुकीत महायुतीला ४२ जागा मिळाल्या होत्या. यंदा ४८ पैकी ४८ जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

दोन देशमुखांबद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही : देशमुख- अनेक वर्षे सत्ता भोगूनही या शहराची काय अवस्था आहे. हद्दवाढ भागात लाईट नाही, पिण्याचे पाणी नाही. या शहराला मिळालेल्या गेल्या १५ वर्षातील आणि आमच्या पाच वर्षातील निधीचा हिशेब करायला मी तयार आहे. या जिल्ह्याला आठ लाल दिव्याच्या गाड्या होत्या. या गाड्यांमुळे जिल्ह्याचा काय फायदा झाला. या शहराचे कसे वाटोळे झाले याचे चिंतन करावे लागेल. हे आम्हाला सांगतात की दोन देशमुख काय कामाचे? यांना नैतिक अधिकार नाही, असेही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकraosaheb danveरावसाहेब दानवेRaosaheb Danweरावसाहेब दानवेSharad Pawarशरद पवारmayawatiमायावती