शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

डाळिंब बागा जगविण्यासाठी पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:44 IST

संगेवाडी परिसर : नीरा उजवा कालव्याचे पाणीच मिळाले नाही

सांगोला : नीरा उजवा कॅनॉलचे पाणी न मिळाल्याने संगेवाडीसह परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकºयांकडून ऐन पावसाळ्यातही डाळिंब बागांना टँकरने पाणीपुरवठा करून बागा जगविल्या जात आहेत. 

संगेवाडी, मांजरी, शिरभावी, धायटी, मेथवडे, देवकतेवाडी, हलदहिवडी या भागात डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. नीरा उजवा कालव्याचे पाणी उन्हाळा हंगामात मिळाले नव्हते. ऐन पावसाळ्यातही अद्याप नीरा उजवा कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे डाळिंब बागा सुकून जाऊ लागल्या आहेत. सांगोला तालुक्यातील सर्वात कमी पावसाची नोंद संगेवाडी मंडलमध्ये झाली आहे. यामुळे डाळिंब बागा जगविण्यासाठी शेतकºयांना विकतचे टँकरने पाणी आणून बागांना द्यावे लागत आहेत.

ज्या शेतकºयांकडे मोठी तळी आहेत, अशा शेतकºयांच्या बागा सध्या सुस्थितीत आहेत, परंतु ज्यांना शेततळी नाहीत, अशा डाळिंब उत्पादक शेतकºयांना बागा जगविणे मुश्कील बनले आहे. खडकाळ जमिनीमध्ये असलेल्या डाळिंब बागांना सतत पाणी द्यावे लागत आहे. एका छोट्या-मोठ्या टँकरसाठी शेतकरी २२०० ते २५०० रुपये देऊन विकतचे पाणी घेत आहेत. शेतकरी आपल्या शेतात छोटासा खड्डा घेऊन त्यामध्ये ते कागद टाकून टँकरचे पाणी साठवून ठेवून ते पाणी विद्युत मोटारीने बागांना देत आहेत.

टॅँकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही- विहिरी व विंधन विहिरी कोरड्या पडल्याने शेतकºयांना सध्या बागा जगविण्यासाठी टँकरच्या पाण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. काही शेतकºयांनी पाऊस पडेल या आशेवर डाळिंबाचा बहर धरला आहे. मात्र पाऊस नसल्याने या परिसरातील पशुधन छावणीवर असून बहरलेल्या बागा सुकू लागल्या आहेत. बागांना नीरा उजवा कॅनॉलचे पाणी मिळेपर्यंत जगविणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी ऐन पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करून बागा जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पाऊस पडेल या आशेवर मी डाळिंबाचा बहार धरला आहे. सध्या विहीर व बोअर कोरडे पडल्याने मला कॅनॉलचे पाणी येईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. एका टँकरसाठी २५०० रुपये द्यावे लागत आहेत.- सोपान खंडागळेडाळिंब उत्पादक शेतकरी, संगेवाडी

नीरा उजवा कालव्याच्या पाण्याचे राजकारण सोडून नियमानुसार टेल टू हेड पाणी दिले असते तर या भागातील नागरिकांवर पाणीसंकट ओढवले नसते. उन्हाळ्यातही पाणी मिळाले नव्हते. सध्या तरी कॅनॉलचे लवकर पाणी सोडावे.- आप्पासोा खंडागळेडाळिंब उत्पादक शेतकरी

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकFarmerशेतकरीagricultureशेतीdroughtदुष्काळ