शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवात सोलापूर शहरात पाणीटंचाई, नागरिकांचा ‘जागरण गोंधळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:41 IST

नियोजन बिघडले : दोन दिवसांत स्थिती सुधारेल, मनपा प्रशासनाचा दावा; वीजपुरवठ्यात समस्या

ठळक मुद्देदोन दिवसांत हा विस्कळीतपणा दूर होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केलाशहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालाअनेक भागात पाणीच न आल्याने तारांबळ

सोलापूर : ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पाण्यासाठी ‘जागरण’ करावे लागत असल्याने लोकप्रतिनिधींनी ‘गोंधळ’ सुरू केला आहे. दोन दिवसांत हा विस्कळीतपणा दूर होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. 

उजनी आणि टाकळी पंपहाऊसमधील वीज पुरवठा मागील बुधवारी १२ तासाहून अधिक वेळ खंडित झाला होता. पंपहाऊसमधील वीज पुरवठा तासभर खंडित झाला की, शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळा किमान चार तासांनी पुढे जातात. घटस्थापनेपूर्वी शहरातील नागरिक घराच्या स्वच्छतेची कामे हाती घेतात. अनेक भागात पाणीच न आल्याने तारांबळ झाली. पाच दिवसांपासून विडी घरकूल, जुळे सोलापूर, शेळगी आदी भागात पाणीच न आल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत.

बुधवारी सकाळी ११ वा.च्या दरम्यान साखरपेठ, भद्रावती पेठ, दाजीपेठ, अक्कलकोट रोड, जुळे सोलापूर या परिसरात पाणी सोडण्यात येईल, असे झोन कार्यालयांकडून सांगण्यात आले होते. साखरपेठेसह परिसरात सायंकाळी ४ नंतर पाणी सोडण्यात आले. मात्र कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. जुळे सोलापुरातील रजनी पार्क, गोकुळ नगर, ज्ञानेश्वर नगर, रुबी नगर, जगदंबा नगर, लक्ष्मी पार्क, नरसिंह नगर या भागातही पहाटे पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, सायंकाळपर्यंत अनेक भागात पाणी आलेच नव्हते. झोन कार्यालयाकडे विचारणा केल्यानंतर धीर धरा, पाणी येईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले. 

पाणीपुरवठा उशिराने होईल, असे महापालिकेने जाहीर केले होते. मंगळवारी पहाटेपर्यंत अक्कलककोट रोड, विडी घरकूल भागातील नागरिक  पाणी येईल याची वाट पाहत होते. मंगळवारी पाणी आले, पण कमी दाबाने, त्यामुळे लोकांमध्ये रोष निर्माण झाला.- गुरुशांत धुत्तरगावकर,नगरसेवक, शिवसेना. 

 जुळे सोलापुरातील नागरिकांनी पहाटे ५.३० वाजल्यापासूनच पाणी कधी येईल, याबाबत विचारणा करायला सुरुवात केली होती. सणासुदीचे दिवस पाहून वेळेवर पाणी येईल, असे नियोजन करणे आवश्यक होते. पाणीच न आल्याने लोकांचा संताप अनावर होणे सहाजिकच आहे. - संगीता जाधव, नगरसेविका, भाजप. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणीNavratriनवरात्री