शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
2
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
3
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
4
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
5
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
6
मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत
7
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
8
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!
9
धक्कादायक! आंध्र प्रदेशात भीषण अपघात, महामार्गावर बस-ट्रकची धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
10
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
11
Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 
12
इन्स्टाग्राम रील्सच्या मदतीने ५५ लाखांची चोरी; मुंबई पोलिसांनी रायगडमधून दोन तरुणींना अटक
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
14
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
15
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
16
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
17
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
18
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
19
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
20
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक

वॉटर कप स्पर्धा २०१८ - सोलापूर जिल्ह्यात १ हजार ८२० कोटी लिटर पाण्याचा साठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 5:54 PM

४५ दिवस सुरू असलेल्या श्रमदानामुळे सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली़

ठळक मुद्दे२३५ गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला१५० गावात जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणावर झाले़ सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली़

आप्पासाहेब पाटील सोलापूर : एकजुटीने पेटले रान तुफान आलंया! काळ्या भुईच्या भेटीला आभाळ आलंया़...! या उभारी देणाºया गीतामधील ओळींप्रमाणे यंदा सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील २३५ गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला होता़ दरम्यान, १५० गावात जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणावर झाले़ यंदा जिल्ह्यातील १५० गावातील लोकांनी केलेल्या श्रमदानातून १८२ घनमीटर जलसंधारण, पाणलोटचे काम झाले़ या कामातून जिल्ह्यात भविष्यात १ हजार ८२० कोटी लिटर पाण्याचा साठा होणार असल्याचा अंदाज पाणी फाउंडेशनने वर्तविला आहे़

सोलापूर जिल्ह्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेस ८ एप्रिल २०१८ रोजी प्रारंभ झाला़ २२ मे २०१८ ही या स्पर्धेची अंतिम तारीख होती़ ४५ दिवस सुरू असलेल्या श्रमदानामुळे सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी लोकचळवळ उभी राहिली़ पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या गावातील प्रमुख पाच लोकांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात श्रमदानाचे काम झाले़

श्रमदानाबरोबरच मशिनच्या सहाय्याने जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण रचना उभारून पाणी साठवण क्षमता निर्माण करण्याचा ध्यास गावकºयांनी पूर्ण केला़ या स्पर्धेसाठी भारतील जैन संस्था, जिल्ह्यातील साखर कारखाने, बालाजी अमाईन्स ग्रुप यांच्यासह विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासन तसेच सर्वच विभागाच्या शासकीय अधिकाºयांनी श्रमदानात सहभाग नोंदवून गावातील श्रमकºयांना प्रोत्साहित करण्याबरोबरच जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या मोहिमेत सहभाग नोंदविला.

गावातील कामांची तपासणी सुरूच्घरातून वाया जाणाºया पाण्यासाठी शोषखड्डे, पर्यावरण समतोल राखण्यासाठी गावाने रोपवाटिका तयार केल्या़ शिवाय जलसंधारणाची विविध कामे श्रमदानासह मशिनरीचा वापर करून करण्यात आली़ माती परीक्षण, काडीपेटी मुक्त शिवार, गावाच्या पाण्याचे बजेट, नापेड प्रकल्प, माथा ते पायथा या तंत्राने जलसंधारणाची कामे केली़ या श्रमदानाच्या कामानंतर जिल्हास्तरीय समितीच्या मार्गदर्शनाखाली पाणी फाउंडेशनची समिती सध्या गावनिहाय भेटी देऊन झालेल्या कामांचे मोजमाप करून गुणवत्ता तपासत आहे़ गावांमध्ये झालेल्या गुणवत्तापूर्ण कामातून सहभागी गावांना गुणदान देण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे़ 

शिवारातील चारी झाल्या पाणीदारच्मागील दोन ते चार दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे श्रमदानाच्या माध्यमातून लोकांनी केलेल्या चारीत पाणी साठले आहे़ या साठलेल्या पाण्यामुळे भविष्यात गावे पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईल या आशेने श्रमकरी समाधानी झाले आहेत़ भविष्यात आणखीन पडणाºया पावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाल्यांच्या खोलीकरणात पाणी मोठ्या प्रमाणात साठेल अशी आशा शेतकºयांना वाटू लागली आहे़

पाणी फाउंडेशनचे राज्याचे समन्वयक डॉ़ अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सहभागी तालुक्यातील तालुका समन्वयकांनी योग्य जबाबदारीने काम केले़ श्रमदानाची चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी करण्याचे व ती टिकवून ठेवण्याचे महान कार्य डॉ़ अविनाश पोळ करीत आहेत़ येत्या काळात गावे पाणीदार होतील अशी आशा आहे़- विकास गायकवाड, समन्वयक, पाणी फाउंडेशन, सोलापूर

असे झाले तालुकानिहाय काम

  • - उत्तर सोलापूर - ६४ लाख घनमीटर
  • - सांगोला - ४० लाख घनमीटर
  • - माढा - २२ लाख घनमीटर
  • - करमाळा - २१ लाख घनमीटर
  • - बार्शी - २० लाख घनमीटर
  • - मंगळवेढा - १५ लाख घनमीटर

 

  • असा होईल पाण्याचा साठा
  • - उत्तर सोलापूर - ६४० कोटी लिटर पाणीसाठा
  • - सांगोला - ४०० कोटी लिटर पाणीसाठा
  • - माढा - २२० कोटी लिटर पाणीसाठा
  • - करमाळा - २१० कोटी लिटर पाणीसाठा
  • - बार्शी - २०० कोटी लिटर
  • - मंगळवेढा - १५० कोटी लिटर पाणीसाठा
टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणीgovernment schemeसरकारी योजना