शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पोलीस दलातही वारकरी संप्रदाय तयार झाला - एस. विरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:04 PM

वारी अधिकाºयांची....लोकमत पंढरपूर आषाढी वारी स्पेशल

ठळक मुद्देसोलापूरच्या पोलीस दलातही आता एक वारकरी संप्रदाय तयार झाला वारीतून समाज प्रबोधनाचे मोठे कामयंदाच्या वारीमध्ये पोलीस दलाची एक प्रबोधन दिंडी सहभागी

न वर्षांपूर्वी मी सोलापूर जिल्ह्यात रुजू झालो तेव्हा वारी तोंडावर होती. एवढ्या मोठ्या गर्दीचे नियंत्रण करायचे कसे हा प्रश्न माझ्यासमोर होताच. आमच्या सहकाºयांनी तयार केलेला कागदावरचा आराखडा माझ्यासमोर होता. पण प्रत्यक्षात काय होईल याबद्दल धाकधूक होती. वारीमध्ये आमचे लोक १५-१५ तास काम कसे करतील, याबद्दलही शंका होती.

वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर मात्र खूपच सुखद अनुभव आला. वारकरी खूपच शिस्तबद्ध पद्धतीने चालत होते, माऊली माऊली म्हणत गर्दीतून वाट काढीत होते. त्यांचा उत्साह आम्हाला ऊर्जा देणारा ठरला. यामुळेच तर पोलीस कर्मचारी उत्साहात काम करीत असल्याचे पाहायला मिळाले. इतर बंदोबस्तांपेक्षा हा बंदोबस्त खूपच वेगळा असल्याचेही मला लक्षात आले. एरव्ही व्हीआयपी सभा, गर्दी येथील अनुभव आणि वारीचा अनुभव वेगळा ठरला. 

आता मी माझ्या सहकाºयांना नेहमी सांगतो की, वारीला येणारी माणसं खूप चांगली माणसं असतात. ही माणसं आहेत म्हणून समाजात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. कायदा व सुव्यवस्था सांभाळणारी ही एकप्रकारची शक्ती आहेच. मी पाहतोय की वयाची पासष्टी ओलांडलेली हजारो माणसं चालत पंढरपूरला येतात आणि चालतच परत जातात. या अशा माणसांची सेवा हे आमचे आणि विशेषत: सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे भाग्यच आहे.

मी माझ्या सहकाºयांना सांगितलंय की, या बंदोबस्तात तुम्ही काठी वापरायचीच नाही. तुमची काठी तिकडे गुन्हेगारांसाठी वापरा. वारीच्या बंदोबस्ताला काठीची गरज नाही. फक्त शिड्डीवर काम होऊन जाते. ज्या आस्थेने लोक येतात, ती भावना तुम्ही समजून घ्या. शहरातील सर्वसामान्य माणसांपेक्षा मोठ्या उंचीवर पोहोचलेली ही मंडळी आहेत. आमच्या पोलीस दलातील काही लोक तर आवर्जून वारीचा बंदोबस्त मागवून घेतात. आम्ही देहू, आळंदीलाही सोलापूर पोलीस दलातील काही लोकांना पाठवितो. पुण्यातही पाठवितो. साहेब मला आळंदीला पाठवा, मी चालत येतो, असे म्हणणारेही कर्मचारी आहेत.

पंढरपुरातही बंदोबस्ताला जाणारे काही लोक आहेत. १० ते १५ लोक दरवर्षी आपल्या पोलीस निरीक्षकाला सांगतात की, साहेब मला वारीच्या बंदोबस्ताला पाठवा. सोलापूरच्या पोलीस दलातही आता एक वारकरी संप्रदाय तयार झाला आहे. वारीतून समाज प्रबोधनाचे मोठे काम होते. यंदाच्या वारीमध्ये पोलीस दलाची एक प्रबोधन दिंडी सहभागी झाली आहे. शब्दांकन : राकेश कदम

टॅग्स :SolapurसोलापूरAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस