शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

पाच लाखांपर्यंतचा उपचार मोफत हवा ? मग या योजनेची माहिती जाणून घ्या

By appasaheb.patil | Published: September 27, 2022 4:17 PM

गरिबांना आर्थिक आधार: दुर्धर आजारावर मोफत उपचार

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यांच्या माध्यमातून दुर्धर आजारांवर मात करण्यासाठी गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत दिली जाते. गेल्या आठ महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील २४ हजार ८५६ रुग्णांना ६० कोटी ३१ लाख ९ हजार ४१३ रुपयांची मदत मिळाली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये ९९६ उपचारांसाठी प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाखापर्यंत विमा संरक्षण (मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाख) तर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत अतिरिक्त २१३ उपचारांसह एकूण १ हजार २०९ उपचारांकरिता प्रतिकुटुंब प्रतिवर्ष ५ लाखांपर्यंत वैद्यकीय संरक्षण दिले जाते.

----------

जिल्ह्यातील ४८ रुग्णालयात घेता येतात मोफत उपचार

जिल्ह्यातील ४८ रुग्णालयात सेवा आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले योजनेंतर्गत सोलापूर शहर व जिल्ह्यातील ४६ रुग्णालयात या आरोग्य विमा रुग्णालयाचा लाभ घेता येतो.

----------

कोणाला मिळतो योजनेचा लाभ...

महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजना

- पिवळे, केशरी, अंत्योदय व इतर शिधापत्रिकाधारक कुटुंबे, अवर्षणग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका व सात-बारा उताराधारक शेतकरी कुटुंबे, लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका व फोटो ओळखपत्र आवश्यक.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा असा घ्या लाभ

- सामाजिक, आर्थिक जातनिहाय जनगणनेत नोेंदीत ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबे, आयुष्यमान कार्ड (ई-कार्ड) व फोटो ओळखपत्र आवश्यक, ई-कार्ड काढण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्राला भेट द्या.

-----------

असा घ्या उपचार

  • - उपचारासाठी योजनेच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्राला भेटा
  • - आरोग्य मित्राकडून योजनेविषयी संपूर्ण मार्गदर्शन ऐका.
  • - डॉक्टरांचे मार्गदर्शन व आवश्यक त्या चाचण्या करा
  • - ठरलेल्या वेळेत पात्र रुग्णांवर डॉक्टरांचे उपचार होतात
  • - उपचार झाल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी व परतीच्या प्रवासाची रक्कम मिळते

--------

आर्थिक परिस्थिती नसतानाही उपचार करता येत असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. आयुष्यमान भारत योजनेमुळे एका कुटुंबाला वर्षाकाठी आजारावर खर्च करण्यासाठी पाच लाखांपर्यंत लाभ प्रत्येक कुटुंबाला मिळतो. या योजनेतून उपचार करून घेण्यासाठी अनेक लोक पुढे येत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले योजनेचाही अनेक लोक लाभ घेतात.

- डॉ. रवि भोपळे, जिल्हा समन्वयक, आरोग्य योजना, सोलापूर

----------

१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२

  • लाभ घेतलेले रुग्ण - २४ हजार १९०,
  • झालेला मोफत उपचार खर्च - ६० कोटी ३१ लाख १० हजार

१ एप्रिल २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२

  • लाभ घेतलेले रुग्ण - ११ हजार २०४,
  • झालेला मोफत उपचार खर्च - २८ कोटी ४५ लाख ७३ हजार
टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलayushman bharatआयुष्मान भारत