शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

भटक्या कुत्र्यांची स्वखर्चातून भूक भागवितोय ‘अन्नदाता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:55 AM

जवळ बोलावून घालतात खाऊ : अकरा वर्षांपासून दररोज दोन वेळा भागवितात भूक

ठळक मुद्देमोकाटकुत्री म्हणजे खूप वाईट, कधीही चावतील, गाडीच्या मध्ये येऊन आपल्याला पाडतील, अशा भीतीने अनेक जण कुत्र्याला जवळ बोलावत नाहीतएकदा जर तुम्हाला कुत्र्यांचा लळा लागला की मग तुम्ही त्यांना खाऊ घाला किंवा न घाला ते तुमच्या जवळ येणारच असाच लळा २००८ मध्ये सोलापुरातील जी़ शिंदे  यांना लागला.

रुपेश हेळवे सोलापूर : कुत्र्याइतका प्रामाणिक प्राणी कोणता नाही़, असे सांगितले जाते़ याची अनेक जिवंत उदाहरणेही आपण अनेकांनी पाहिली आहेत़ पण हाच कुत्रा कधी रस्त्यावर फिरताना दिसला की मग त्याला गाडीवर जाता-जाता लाथा मारणारे, दगड मारणारे, हुसकावणारे आपण शेकडो पाहिले असतील़ पण भटका कुत्रा दिसल्यावर त्याला जवळ बोलावून त्याची सेवा करणारा ‘कुत्र्यांचा अन्नदाता’ सोलापुरात आहे़ न चुकता दिवसातून दोन वेळा कुत्र्यांना जेवायला देणारा हा माणूस़ शहरातील जवळपास शंभर भटक्या कुत्र्यांना स्वखर्चाने खायला घालतो़ एवढेच नाही तर त्यांच्यावर औषधोपचारही तो करतो.

मोकाटकुत्री म्हणजे खूप वाईट, कधीही चावतील, गाडीच्या मध्ये येऊन आपल्याला पाडतील, अशा भीतीने अनेक जण कुत्र्याला जवळ बोलावत नाहीत. पण एकदा जर तुम्हाला कुत्र्यांचा लळा लागला की मग तुम्ही त्यांना खाऊ घाला किंवा न घाला ते तुमच्या जवळ येणारच असाच लळा २००८ मध्ये सोलापुरातील जी़ शिंदे  यांना लागला. यामुळेच ते दिवसातून दोन वेळा दररोज जवळपास शंभर कुत्र्यांना न चुकता खाऊ घालतात़ तेव्हापासून त्यांची ही सेवा निरंतरपणे चालू आहे़ एवढेच नाही तर कुत्र्यांना जर कुठे जखम झाली असेल तर त्यांना ते औषधोपचारही करतात़ यामुळे ते शहरात कुठेही फिरले तरी त्यांच्याजवळ कुत्र्यांचा घोळका उभारलेला असतो.

ते सकाळी पार्क चौक, पार्क चौक परिसरातील विविध चाळ, आरटीओ परिसरात कुत्र्यांना दररोज अन्न घालतात़ याचबरोबर ते जिथे राहतात त्यांच्या घराच्या परिसरात असणाºया कुत्र्यांनाही ते दररोज खाऊ घालतात़ एवढंच नाही तर पाऊस सुरू झाला की मग लगेच त्या कुत्र्यांना आपल्या अंगणात जागाही देतात़ यामुळे त्यांना अनेकदा अडचणी येतात़ कुत्री येणाºया-जाण्यांवर भुंकतात, तेव्हा मात्र शेजाºयांशी त्यांचे वाद होत असतात़ पण तरीही ते आपली सेवा निरंतर सुरूच ठेवतात़ शिंदे यांना तीन मुले आहेत़ ही तिन्ही मुले उच्चशिक्षण घेत आहेत़ मुले आणि त्यांची पत्नी या सेवेत शिंदे यांना मदत करतात.

कुत्र्यांसाठी दररोज शंभर ब्रेड पाकिटे ...एका मोकाट कुत्रीने आॅफिसच्या खाली पिल्लांना जन्म दिला होता, हे शिंदे यांना दिसले़ खूप दिवस होऊनही तिला काही खायला मिळाले नाही़ त्यामुळे कुत्री व पिल्ले हे अशक्त होऊन पडले होते़ अशी अवस्था दिसल्यावर त्यांना वाईट वाटले आणि त्यांना थोडे दिवस खायला दिले़ कुठेही पिल्लांसह कुत्री दिसली की त्यांना खाऊ घालू लागले़ हळूहळू याची सवयच त्यांना पडली़आता ते कुत्र्यांसाठी दररोज शंभर ब्रेड पाकिटे आणि नऊ लिटर दूध घेतात़ आणि दररोज दोन वेळेस या कुत्र्यांना खाऊ घालत असतात.

टॅग्स :Solapurसोलापूरdogकुत्रा