वळसंग पोलिसांच्या १० ठिकाणी धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST2021-05-06T04:23:50+5:302021-05-06T04:23:50+5:30

दक्षिण सोलापूर : वळसंग पोलिसांनी बुधवारी अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम राबवली. एकाच दिवशी अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या आठ जणांवर, ...

Walsang police line at 10 places | वळसंग पोलिसांच्या १० ठिकाणी धाडी

वळसंग पोलिसांच्या १० ठिकाणी धाडी

दक्षिण सोलापूर : वळसंग पोलिसांनी बुधवारी अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम राबवली. एकाच दिवशी अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या आठ जणांवर, तर जुगार अड्डे चालवणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल केले. सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धाडी टाकण्यात आल्या. त्यात आचेगाव, विडी घरकुल, होटगी स्टेशन येथे सुरू असलेल्या गावठी दारू विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले. कुंभारी हद्दीतील विडी घरकुल परिसरात जुगार अड्ड्यावर धाड टाकून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.

अवैध दारू विक्रीप्रकरणी लक्ष्मी सुभाष तरंगे (अचेगाव), शिवपा सोमनिंग माशाळे (आचेगाव), अरविंद सिद्राम कैरमकोंडा (विडी घरकुल), विजय अंबादास चव्हाण (फताटेवाडी), जमनाबाई लक्ष्मण राठोड (होटगी स्टेशन) यांच्यावर, तर अमर मारुती माशाळे (विडी घरकुल) यांच्यावर अवैध जुगार अड्डा चालवल्याने गुन्हे दाखल करण्यात आले.

Web Title: Walsang police line at 10 places