पंढरपुरात मतदानाचा टक्का घटला, मंगळवेढ्याचा कौल ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 03:28 PM2019-10-23T15:28:17+5:302019-10-23T15:29:01+5:30

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ; सुधाकरपंत परिचारक, भारत भालकेंची प्रतिष्ठा पणाला

Voting in Pandharpur declines, decides to be Mangalpadha Kaul | पंढरपुरात मतदानाचा टक्का घटला, मंगळवेढ्याचा कौल ठरणार निर्णायक

पंढरपुरात मतदानाचा टक्का घटला, मंगळवेढ्याचा कौल ठरणार निर्णायक

Next
ठळक मुद्दे गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदानात ४ टक्के घट झाली पावसाळी वातावरणाचा मतदानावर काहीअंशी परिणाम शहरात अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया

सतीश बागल 

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी यंदा एकूण ३ लाख ३३ हजार ५८९ पैकी २ लाख ७ हजार ६२२ (७१.२३) टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गतवर्षी हा आकडा ७५.६७ टक्के इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मतदानात ४ टक्के घट झाली आहे. पावसाळी वातावरणाचा मतदानावर काहीअंशी परिणाम झाल्याचे दिसून आले. दुपारी चार वाजल्यानंतर अनेक ठिकाणी मतदार मोठ्या संख्येने बाहेर आले. त्यामुळे शहरात अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. 

 यंदाच्या निवडणुकीत महायुतीचे सुधाकरपंत परिचारक, राष्टÑवादी काँग्रेसचे भारत भालके, दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे व धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळाली. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक हे निवडणूक मैदानात असल्याने पांडुरंग परिवाराने आपली ताकद पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात लावली होती. भारत भालके यांनी राष्टÑवादीकडून उमेदवारी घेत या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली.

पंढरपूर शहर व तालुक्यातील २१ गावांमध्ये परिचारक व भालके असा सामना पाहायला मिळाला, तर मंगळवेढा मतदारसंघात समाधान आवताडे व शिवाजीराव काळुंगे यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. शेवटच्या चार दिवसांत आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यात जोरदार प्रचार यंत्रणा राबविल्याने आता मंगळवेढा शहर व तालुक्यातून कुणाला मताधिक्य मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

पावसाचा परिणाम
- पावसाळी वातावरणामुळे अनेक मतदान केंद्रांच्या आवारात पाणी साचलेले होते, तसेच चिखल झाला होता. यातून मार्ग काढत मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी जावे लागत होते. अशा स्थितीतही मतदानासाठी युवा मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असल्याने सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. 

Web Title: Voting in Pandharpur declines, decides to be Mangalpadha Kaul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.