सकारात्मकता; बहिष्कार टाकलेल्या ‘दक्षिण’मधील गावातही मतदान सुरू

By appasaheb.patil | Published: October 21, 2019 10:51 AM2019-10-21T10:51:43+5:302019-10-21T10:54:57+5:30

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात ३़ ५७ टक्के मतदान

Voting also started in the boycotted 'South' village | सकारात्मकता; बहिष्कार टाकलेल्या ‘दक्षिण’मधील गावातही मतदान सुरू

सकारात्मकता; बहिष्कार टाकलेल्या ‘दक्षिण’मधील गावातही मतदान सुरू

Next
ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यात विधानसभा मतदानाला सुरूवात- दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांनी घातला मतदानावर बहिष्कार- मतदान करण्यास ग्रामस्थांनी सुरूवात केल्याने बहिष्कार आता मागे घेतल्याचे दिसत आहे

सोलापूर : उजनीच्या पाण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांनी विधानसभा मतदार निवडणुकीसाठी होणाºया मतदानावर बहिष्कार टाकला होता़ मात्र सोमवारी सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेत या गावातील नागरिकांनी सहभाग मतदान करण्यास सुरूवात केली आहे. हा बहिष्कार आता मागे घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दर्गनहळ्ळी, कर्देल्ली, धोत्री , शिरपनहळ्ळी, वडगाव, बोरामणी, वडगांव, लिंबीचिंचोळी, कुंभारी, उळे, कासेगांव, मुस्ती ही गावे दक्षिण सोलापूर तालुक्यातील असली तरी त्यांचा समावेश अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येतो.

 या गावांनी उजनीच्या पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. हा बहिष्कार आता मागे घेतल्याचे दिसून येत आहे़ याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांना निवेदनही दिले होते़  सकाळपासूनच मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.


 

Web Title: Voting also started in the boycotted 'South' village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.