शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

११ विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या फटाक्यांची आज वात विझणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 11:08 IST

सोलापूर जिल्ह्यातील मतदानाची तयारी: नॉर्थकोट, नूतन प्रशाला, एसआरपी कॅम्प येथे होणार उत्तर, मध्य अन् दक्षिणची मतमोजणी

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३५२१ मतदान केंद्रांवर ईव्हीएम: ४२२७, कंट्रोल युनिट: ५३२२ आणि व्हीव्हीपॅट: ४५७६ लागणार११ विधानसभा मतदारसंघांमधील मतदान प्रक्रिया करून घेण्यासाठी १८ हजार ३१० कर्मचारी नियुक्त१४०० च्या पुढे मतदारसंख्या असणारी ६५ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांसाठी अतिरिक्त व्हीव्हीपॅट मशीन लागणार

सोलापूर : जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा समारोप शनिवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. गेले पंधरा दिवस विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरू असलेले भोंगे आज बंद होणार आहेत. प्रशासनाने मतदानाची तयारी सुरू केली असून, सोलापूर शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण सोलापूरची मतमोजणी रामवाडी गोदामाऐवजी अनुक्रमे नॉर्थकोट हायस्कूल, नूतन प्रशाला आणि एसआरपी कॅम्प येथे केली जाणार आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक दिवस उरला आहे. विधानसभेच्या ११ जागांसाठी १५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीची प्रचारधुमाळी शेवटच्या टप्प्यात चुरशीची बनली आहे. महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांतील नेत्यांनी उमेदवारांच्या प्रचाराला हजेरी लावली. त्यामुळे विमाने व हेलिकॉप्टरच्या घिरट्या वाढल्या होत्या. उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पदयात्रा, रॅली, कॉर्नर सभा आणि जाहीर सभांवर भर दिला. शनिवारी प्रचाराचा समारोप पदयात्रेद्वारे करण्याचे उमेदवारांनी नियोजन केले आहे. आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराला रंगत आली आहे. शनिवारी प्रचार संपत असून, प्रशासनाने मतदान नोंदविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. जिल्ह्यातील ३५२१ मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा पूर्ण करण्यात येत आहेत. मतदान साहित्य रविवारी सकाळी वाटप करण्यात येणार आहे. 

यासाठी सर्व निवडणूक कार्यालयात हे साहित्य तयार ठेवण्यात आले आहे. साहित्य वाटपासाठी टेबल सज्ज ठेवण्यात आले आहेत. ज्या कर्मचाºयांना ड्यूट्या लावण्यात आल्या आहेत त्यांना जबाबदारीचे वाटप झाले असून, प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील सखी मतदान केंद्रे - जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रांवर महिला कर्मचाºयांचे राज्य असणार आहे. त्या केंद्रांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. करमाळा: केंद्र क्र. ९२, नगरपालिका उर्दू मुलांची शाळा, मेनरोड करमाळा, माढा: केंद्र क्र. ८०, झेडपी प्राथमिक मुलांची शाळा क्र. १, बार्शी: केंद्र क्र. ११६, जिजामाता विद्यामंदिर, मोहोळ: केंद्र क्र. १०३, झेडपी प्राथमिक शाळा, दत्तनगर, सोलापूर शहर उत्तर: केंद्र क्र. १०३, शरदचंद्र पवार प्रशाला, उमानगर, शहर मध्य: केंद्र क्र. २८२, सेल्स टॅक्स आॅफिस, होटगी रोड, अक्कलकोट: केंद्र क्र. १४५, श्री शहाजी हायस्कूल, दक्षिण सोलापूर: केंद्र क्र. २८३, नेताजी सुभाषचंद्र प्रशाला, पंढरपूर: केंद्र क्र. ९७, द. ह. कवठेकर प्रशाला, सांगोला: केंद्र क्र. १६६, झेडपी प्राथमिक शाळा, पुजारवाडी, माळशिरस: केंद्र क्र. १३६, झेडपी प्राथमिक मुलांची शाळा क्र. १. 

वाहनांची अशी व्यवस्था- ईव्हीएम मशीन व कर्मचारी मतदान केंद्रांपर्यंत नेणे व मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोच करण्यासाठी पुढीलप्रमाणे वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. एस.टी. बस: ५२२, जीप: २२२, सेक्टर आॅफिसरसाठी जीप: ३६६, आरओ व एडीओसाठी ५० कार लागणार आहेत. सोलापूर शहर मध्य, पंढरपूर आणि सांगोला विधानसभेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम लागणार आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यातील ३५२१ मतदान केंद्रांवर ईव्हीएम: ४२२७, कंट्रोल युनिट: ५३२२ आणि व्हीव्हीपॅट: ४५७६ लागणार आहेत. १४०० च्या पुढे मतदारसंख्या असणारी ६५ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांसाठी अतिरिक्त व्हीव्हीपॅट मशीन लागणार आहेत.

१८ हजार कर्मचारी- ११ विधानसभा मतदारसंघांमधील मतदान प्रक्रिया करून घेण्यासाठी १८ हजार ३१० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात दिव्यांग मतदार १८ हजार १३९ इतके आहेत. त्यात चालता न येणारे १९११ मतदान केंद्रांवरील ७ हजार ३८५ मतदार आहेत. या मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर व गरज भासल्यास त्यांना घरून आणण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

पाऊस झाला तर...- जिल्ह्यात सध्या पावसाची स्थिती आहे. पावसामुळे मतदान केंद्रावर चिखल किंवा येणाºया रस्त्यावर अडथळा निर्माण झाला तर संबंधित महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने याबाबत तत्काळ नियोजन करण्याबाबत सूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. मतदानाला आणखी दोन दिवसांचा अवधी आहे. २१ आॅक्टोबर रोजी काय परिस्थिती असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकVotingमतदान