शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल मंदिर मूळ रूपात दिसणार, गरुड खांबही चांदीने चमकणार

By दिपक दुपारगुडे | Updated: May 26, 2024 19:00 IST

गरुड खांबही चांदीने चमकणार असल्याचे मंदिरस समितीकडून सांगण्यात आले.

सोलापूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. वारकरी भाविकांना विठ्ठल मंदिराचे ७०० वर्षांपूर्वीचे सुंदर रूप पहावयास मिळणार आहे. गरुड खांबही चांदीने चमकणार असल्याचे मंदिरस समितीकडून सांगण्यात आले.

श्री विठ्ठल मंदिर व रुक्मिणी मंदिर गाभारा संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही याची दक्षता घेऊन कामास सुरुवात करण्यात आली आहे. हे काम पूर्णत्वास येत असून संवर्धनाचे काम दर्जेदार होऊन पुढील अनेक वर्ष टिकेल यादृष्टीने करण्यात आले आहे.

श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज, सर्व सदस्य, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने वास्तु विशारद तेजस्विनी आफळे, ठेकेदार येवले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केली व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. मंदिरातील देवाचे गर्भगृह चौखांबी आणि सुळखांबी आता सातशे वर्षांपूर्वी च्या मूळ रूपात येऊ लागली आहेत. गर्भगृहात मूळ रूपातील गाभाऱ्यात देवाचे सावळे रूप खुलून दिसत आहे. दगडांनाही पॉलिश काम सुरू आहे. मंदिराचे संवर्धन व जीर्णोद्धारची कामे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे.  मंदिरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले गरुडखांब यास अलिंगन दिल्यशिवाय वारकरी तृप्तच होत नाही. गरुड खांबास चांदीचा पत्रा लावू नये असे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे. कारण या खांबास चांदीचा पत्रा लावल्यास दगडांना श्वास मिळणार नाही दगड खराब होतो. गरुड खांबास कुठल्याही परिस्थितीत चांदी लावावीच लागणार आहे. -ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सदस्य, विठ्ठल मंदिर समिती

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर