शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलाच्या दारी वारकऱ्यांची गर्दी

By admin | Updated: June 10, 2014 01:04 IST

निर्जला एकादशी: विठ्ठलाच्या दर्शनासाठी दोन लाख भाविक

पंढरपूर : ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असून, यापैकी ४५ हजार पददर्शन तर ६० हजारांच्या आसपास भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. दिवसभर अडीच लाख भाविकांची मांदियाळी पंढरीत होती. निर्जला एकादशी ही भीमसेन या नावानेही ओळखली जाते. या एकादशीनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरीत दाखल झाले होते. भाविकांनी रेल्वेचा प्रवास सोयीस्कर वाटल्याने, पंढरपूरला रेल्वेने येणे जादा पसंत केले. यामुळे रेल्वे स्थानकाकडून विठ्ठल मंदिराकडे भाविक जादा संख्येने येत होते. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी रांग लावली होती. सकाळी दर्शनरांग विप्र दत्त घाटापर्यंत पोहचली होती. मात्र सायंकाळी दर्शन रांगेने दर्शन मंडपाचे आठ गाळे भरले होते. विठ्ठलाला नेहमीप्रमाणे सर्व नित्योपचार करण्यात आले. तसेच विठ्ठलाच्या दर्शनासाठी होत असलेली वाढती गर्दी पाहून स्टेशन रोड व प्रदक्षिणा मार्गावर किरकोळ व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती. रस्त्यावरील दुकानांमुळे व रस्ते विविध कामांसाठी खोदल्याने भाविकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत होता.निर्जला एकादशीसाठी ४ हजार ५०० भाविकांनी आॅनलाईन विठ्ठलाच्या दर्शनासाठी बुकिंग केले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन छोट्या दिंड्या प्रदक्षिणा मार्गावरुन फेरी मारुन जात होत्या. त्यामधील वारकरी जागोजागी भजन, कीर्तनामध्ये दंग झाले होते. ---------------------साडेचार हजार भाविकांचे आॅनलाईन दर्शननिर्जला एकादशीसाठी ४ हजार ५०० भाविकांनी आॅनलाईन विठ्ठलाच्या दर्शनासाठी बुकिंग केले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन छोट्या दिंड्या प्रदक्षिणा मार्गावरुन फेरी मारुन जात होत्या. त्यामधील वारकरी जागोजागी भजन, कीर्तनामध्ये दंग झाले होते.