शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रनिमित्त विठ्ठल मंदिरातील दागिने पुन्हा गाठविले; रुक्मिणी मातेला असणार आकर्षक पोशाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2018 16:39 IST

दहा दिवसांपासून सुरू असलेले स्वच्छता व गाठविण्याचे काम पूर्ण

पंढरपूर : नवरात्र उत्सव दोन दिवसावर आला असून या उत्सवात रुक्मिणी मातेला विविध रूपात सजविला सजविले जाते. त्यामुळे या सजावटी दरम्यान घालण्यात येणाऱ्या आकर्षक पारंपरिक दागिन्यांचे मागील दहा दिवसांपासून सुरू असलेले स्वच्छता व गाठविण्याचे काम रविवारी पूर्ण झाले आहे. मंदिर समितीतर्फे नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी यांना आकर्षक पोशाख घालण्यात येतो. तसेच रोज विविध प्रकारचे रुपे देऊन दागिने ही घालण्यात येतात. हे दागिने व्यवस्थित राहावेत, सुंदर दिसावेत यासाठी नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी त्यांची स्वच्छता करण्याचे काम मंदिर समितीकडून प्रत्येक वर्षी केले जाते. विठ्ठलाला घालण्यात येणाऱ्या दागिन्यांमध्ये 45 दागिन्यांचा समावेश आहे. यामध्ये लहान व लाफ्फा मोठा, कौस्तुभ मनी, बाजीराव कंठी, मोत्याचा कंठा, मोर मंडोळी, मोहराची माळ, पुतळ्याची माळ, बोरमाळ यासह अन्य दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय रुक्मिणी मातेला ४५ ते ५० दागिने घालण्यात येतात. यामध्ये खड्याची वेणी,  मोठा व लहान मणी, मोत्याचे मंगळसूत्र, पाचोची गरसोळी, जडावाचा हार, नवरत्नचा हार, मोहराची माळ, पुतळ्याची माळ, सोन्याचे गोठ, सोन्याचे पैंजण, मोत्याचा बिंदी, यासह अन्य दागिन्यांचा समावेश होतो. हे सर्व दागिने गाठून घेण्याचे काम व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या समक्ष पटवेकरी व सोनार यांनी मंदिरात केले आहे.

रुक्मिणी माता प्रत्येक दिवशी दिसते वेगळ्या रुपातनवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस रुक्मिणी मातेला वेगळे रूप देण्याचे काम मंदिर समितीच्या पुजाऱ्यांकडून होते. यामध्ये कमलजादेवी, सरस्वती, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, पसरती बैठक, ललिता पंचमी, कन्याकुमारी यासह अन्य रूपांचा समावेश असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व नित्य उपचार विभागाचे प्रमुख अतुल बक्षी यांनी दिली. 

टॅग्स :PandharpurपंढरपूरSolapurसोलापूर