शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
4
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
5
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
6
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
7
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
9
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
10
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
11
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
12
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
13
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
14
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
15
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
16
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
17
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
18
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
19
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पंढपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या चंदनउटीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 11:59 IST

सध्या उष्णतेची दाहकता वाढत असून ती कमी करण्यासाठी पाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेस गुढीपाडव्यापासून प्रारंभ करण्यात आला.  मंदिर समितीच्या वतीने ही सेवा ७ जूनपर्यंत चालणार आहे.

ठळक मुद्देयंदा रोज दोन चंदनउटी पूजा घेण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.यंदा चैत्र यात्रा १६ एप्रिल रोजी असल्याने राज्यभरातून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत येतात. 

पंढरपूर : सध्या उष्णतेची दाहकता वाढत असून ती कमी करण्यासाठी पाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेस गुढीपाडव्यापासून प्रारंभ करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने ही सेवा ७ जूनपर्यंत चालणार आहे. चंदनउटी पूजेसाठी आतापर्यंत श्री विठ्ठलाकडे ९५ तर रुक्मिणीमातेकडे ११ असे एकूण १०६ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या दिवसाचे औचित्य साधून श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेस अलंकार व पारंपरिक पोशाख परिधान करण्यात आला होता. मराठी नववर्षाचे स्वागत करीत असतानाच मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते़ त्यात उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी शीतल, थंड अशा चंदनाचा लेप देवाच्या अंगाला लावला जातो़ ही पूजा करताना ११०० ते १२०० ग्रॅम चंदनाचा वापर करण्यात येतो़ रोज सायं ४़३० ते ५़३० या तासाभरात दोन पूजा होतील़ यंदा श्री विठ्ठलाकडे ९५ तर रुक्मिणीमातेकडे ११ चंदनउटी पूजेसाठीचे अर्ज प्राप्त झाले आहेत़ श्री विठ्ठलाकडील पूजेसाठी २१ हजार रुपये तर रुक्मिणीमातेकडील पूजेसाठी ११ हजार रुपये इतके देणगीशुल्क निश्चित करण्यात आलेले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत श्री विठ्ठलाकडे सहा तर रुक्मिणीमातेकडे साडेतीन हजार रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे़ यंदा चैत्र यात्रा १६ एप्रिल रोजी असल्याने राज्यभरातून लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत येतात. यात्रा कालावधीत चंदनउटी पूजेच्या वेळेत बदल करण्यात येणार असल्याचे बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

पूजा करणाºया कुटुंबास मिळणार प्रसाद- चंदनउटी पूजा करणाºया कुटुंबीयांना मंदिर समितीच्या वतीने पाच प्रकारची प्रत्येकी सहा फळे, पेढा, बर्फी, शिरा, पोहे, सरबत  असा प्रसाद म्हणून दिला जाणार आहे. एका चंदनउटी पूजेस कुटुंबातील १० सदस्य सहभागी होऊ शकतील़ - यंदा रोज दोन चंदनउटी पूजा घेण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरTemperatureतापमान