विष्णुपंत महाडिक यांनी सहकारी संस्था वाढवण्याचे काम केले : बाबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:30+5:302021-01-13T04:54:30+5:30
भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णुपंत महाडिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुळूज (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतमध्ये प्रतिमापूजन महादेव बाबर यांच्या हस्ते ...

विष्णुपंत महाडिक यांनी सहकारी संस्था वाढवण्याचे काम केले : बाबर
भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विष्णुपंत महाडिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुळूज (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतमध्ये प्रतिमापूजन महादेव बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विष्णुपंत महाडिक हे सोसायटीचे ४० वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी सोसायटीच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे काम केले, असल्याचे सांगितले.
यावेळी विठ्ठलचे माजी संचालक राजाराम बाबर, जाकिर मुलाणी, किसन जाधव, भारत पाटील, सरपंच स्वाती शिवाजी शेंडगे, उपसरपंच मधुकर बाबर, माजी सरपंच पंडित बाबर, भारत पाटील, सलीम मुलाणी, लक्ष्मण पांढरे, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी लोमटे, बंडू बाबर, संदीप देवकते, पांडुरंग ताटे आदी उपस्थित होते. (वा.प्र.)
फोटो ओळी :::::::::::::::::::::
पुळूज ग्रामपंचायत येथे स्व. विष्णुपंत महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन करताना महादेव बाबर, लक्ष्मण पांढरे, शिवाजी शेंडगे, पंडित बाबर, सलीम मुलाणी आदी.