सोलापूरात धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 03:30 PM2018-08-24T15:30:01+5:302018-08-24T15:32:05+5:30

Virat Morcha on the Collectorate office of Solapur, Dhangar community | सोलापूरात धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

सोलापूरात धनगर समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

Next
ठळक मुद्दे- सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव द्या- आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्या- धनगर समाजाच्या विविध मागण्यांचा शासनाने त्वरीत विचार करावा

सोलापूर : धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीचे (जा) आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी सोलापूर जिल्हा धनगर समाज अनुसुचित जमात आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला

हा मोर्चा पार्क चौकातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून निघाला़ हा मोर्चा पार्क चौक, सिध्देश्वर प्रशाला, मार्केट चौक पोलीस चौकीसमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला़ धनगर समाजाचा अनुसुचित जमातीत समावेश करावा, सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे, पैठण व परळी येथील धनगर समाजाच्या आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना मराठा समाजाप्रमाणे आर्थिक मदत व शासकीय मदत व नोकरी द्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास दिले

यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सदस्य चेतन नरोटे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, प्रा़ शिवाजीराव बंडगर, अर्जुन सलगर, नगरसेवक आनंद चंदनशिवे, शिवाजी कांबळे, परमेश्वर कोळेकर, विलास पाटील, राष्ट्रवादीचे संतोष पवार, अनिल बर्वे, संतोष वाकसे, निमिषाताई वाघमोडे, मनिषा केशवमाने, पवन पाटील, संजय पाटील आदी बांधव व विविध पक्षातील प्रमुख नेते मोठया संख्येने उपस्थित होते 

Web Title: Virat Morcha on the Collectorate office of Solapur, Dhangar community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.