शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

यापेक्षा गावचे सरपंचपद बरे!

By admin | Updated: June 10, 2014 00:31 IST

जि. प. सदस्यांच्या भावना: पद संपत आले, एकही काम झाले नाही

सोलापूर: पद संपत आले, आतापर्यंत एकही काम झाले नाही, अडीच वर्षांत कसलेच काम झाले नाही, कामासाठी पत्रे मात्र घेतली जातात, जि. प. सदस्यापेक्षा गावचे सरपंच झालेले बरे अशा संतप्त भावना सोमवारी महिला सदस्यांनी व्यक्त केल्या. जिल्हा परिषदेच्या कामावर समाधानी नसल्याचे मागील आठवड्यात खुद्द अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी सांगितले होते. सोमवारी महिला सदस्यांनीही आपल्या भावना उघडपणे सांगितल्या. शिक्षण समितीच्या बैठकीला आलेल्या सदस्या अधिकारी नसल्याने बैठक तहकूब करुन महिला व बालकल्याणच्या सभापती जयमाला गायकवाड यांच्या दालनात बसल्या होत्या. बार्शीच्या सभापती कौशल्या माळी, सांगोल्याच्या ताई मिसाळ, राणी दिघे, मालती देवकर यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजावर तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली. निवडून आल्यानंतर खूप अपेक्षा होत्या, परंतु कामेच होत नाहीत, पद संपत आले, एकही काम झाले नाही, असे त्या म्हणाल्या. शिक्षण समितीचे सदस्य असल्याने किमान शाळांची कामे तरी करता येतील, अशी अपेक्षा होती. तुमची कामे पत्रावर लिहून द्या असे सांगितल्याने लेखी पत्रेही दिली असल्याचे सदस्या म्हणाल्या. जिल्हा परिषद सदस्यापेक्षा गावचे सरपंचपद बरे अशी भावना मालती देवकर यांनी व्यक्त केली. अधिकारी तर भेटले नाहीत, सीईओ मॅडमना भेटण्यासाठी थांबलो असल्याचे त्या म्हणाल्या.-------------------------------सीईओंकडे मांडले गाऱ्हाणे सीईओ श्वेता सिंघल यांना भेटण्यासाठी या सदस्यांनी फोन केल्यानंतर घरीच या असे सांगितले. महिला सदस्यांनी घरी जाऊन आपली गाऱ्हाणी मांडली. आमची पत्रे घेतली परंतु कामेच केली नाहीत, जुन्या शाळा खोल्या इमारती पाडकामाला मान्यता दिली जात नाही, आमची मुदत संपत आली कामे झाली नाहीत?, असे या सदस्यांनी सीईओंना सांगितले. सीईओंनी अधिकाऱ्यांना फोन करुन कामे होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केल्याचे बार्शीच्या सभापती कौशल्या माळी व राणी दिघे यांनी सांगितले.