शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

महामार्गावर रस्ता दुभाजकच्या मागणीसाठी चार गावांच्या ग्रामस्थांनी अडवली वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2022 17:25 IST

मुरूम वाहतूक रोखली : १५ ऑगस्टला अक्कलकोटचा मार्ग रोखणार

सोलापूर : सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर कर्देहळीकडे जाणाऱ्या पादचारी आणि वाहनासाठी रस्ता दुभाजक करण्याची मागणी करीत कुंभारीसह चार गावांतील प्रमुख ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. रस्त्यासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या गाड्या त्यांनी अडवल्या.

यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाकडे कर्देहळ्ळी फाट्याजवळ रस्ता दुभाजक आणि सेवा रस्ता करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामस्थांनी दोन वेळा ठिय्या आंदोलन केले. आज माजी जि. प. सदस्य आण्णाराव बाराचारे यांच्या नेतृत्वाखाली कुंभारी कर्देहळी, वडगाव आणि शिरपनहळ्ळी येथील ग्रामस्थ एकत्र आले. राष्ट्रीय महामार्गासाठी मुरूम वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवल्या. आमच्या मागणीचे पत्र दिल्याशिवाय मुरूम वाहतूक करू देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

मागण्यांचे निवेदन वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी स्वीकारले. ग्रामस्थांची मागणी न्याय्य असून, संबंधित विभागाकडे निवेदन पाठवण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बिपिन करजोळे, कर्देहळीचे सरपंच नागेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णात पवार, सौदागर पवार, शाहू पौळ, हरिभाऊ कदम, राम जाधव, हरिभाऊ पोळ, व्यंकट पाटील, भास्कर पौळ, अशोक माने, पंडित कदम, राजू बिराजदार यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------

..तर पुन्हा आंदोलन

रस्ता दुभाजक अथवा सेवा रस्ता मागणीवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर पुन्हा १५ ऑगस्ट रोजी अक्कलकोट-सोलापूर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कृष्णा पवार यांनी दिला आहे. मंजुरीचे पत्र हातात पडेपर्यंत थांबणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

-----

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय