सोलापूर लोकसभेसाठी विक्रम देशमुख अन् माढा लोकसभेसाठी प्रशांत परिचारक
By राकेश कदम | Updated: June 8, 2023 17:07 IST2023-06-08T17:07:29+5:302023-06-08T17:07:34+5:30
भाजपाने जाहीर केली लोकसभा निवडणुक प्रमुखांची यादी

सोलापूर लोकसभेसाठी विक्रम देशमुख अन् माढा लोकसभेसाठी प्रशांत परिचारक
सोलापूर : भारतीय जनता पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रमुखांची नावे गुरुवारी जाहीर केली. सोलापूर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी विद्यमान शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांची तर माढा लोकसभा प्रमुखपदी माजी आमदार प्रशांत परिचारक यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी ही नावे जाहीर केली. आगामी लोकसभा आणि निवडणुकीची बूथ बांधणी आणि उमेदवार निवडीची तयारी या नेत्यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. माढा विधानसभा प्रमुखपदी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील तर माळशिरस विधानसभा प्रमुखपदी धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड करण्यात आली आहे.