शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विजयसिंह मोहिते-पाटील, सुधाकरपंत परिचारकांमध्ये मनोमीलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 11:02 IST

५० वर्षे अन् तीन पिढ्यांचा संबंध असणारे पंढरपूरचे परिचारक व अकलूजचे मोहिते-पाटील यांच्यात २००९ मध्ये राजकीय वैरत्व आले, ते तब्बल १० वर्षे टिकले. परंतु ही दोन्ही घराणी भाजपवासी होताच पुन्हा मनोमीलन झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देपंढरपूर बाजार समितीच्या आवारात रविवारी आयोजित भाजपच्या संकल्प मेळाव्यात रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पुढाकार घेत परिचारकांकडे मैत्रीचा हात पुढे केलाखा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरीत येऊन माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांची वाड्यावर जाऊन भेट घेतली

पंढरपूर : ५० वर्षे अन् तीन पिढ्यांचा संबंध असणारे पंढरपूरचे परिचारक व अकलूजचे मोहिते-पाटील यांच्यात २००९ मध्ये राजकीय वैरत्व आले, ते तब्बल १० वर्षे टिकले. परंतु ही दोन्ही घराणी राष्ट्रवादीपासून पूर्णत: दुरावून भाजपवासी होताच पुन्हा मनोमीलन झाल्याचे रविवारी आणि सोमवारी पंढरपुरात दिसून आले.

पंढरपूर बाजार समितीच्या आवारात रविवारी आयोजित भाजपच्या संकल्प मेळाव्यात रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पुढाकार घेत परिचारकांकडे मैत्रीचा हात पुढे केला व यास आ. प्रशांत परिचारक यांनीही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रतिसाद दिला़ सकाळ उजाडताच सोमवारी खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरीत येऊन माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांची वाड्यावर जाऊन भेट घेतली़ त्यानंतर पंढरपुरात दिवसभर धाकट्यांबरोबरच मोठेही पुन्हा एकत्र आल्याची चर्चा होती.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर परिचारक व मोहिते-पाटील गटात राजकीय संघर्ष सुरू झाला होता. पुढे मोहिते-पाटील विरोधकांची फळी निर्माण झाली व यास महाआघाडी नाव देण्यात आले. महाआघाडीचे प्रवर्तक संजय शिंदे सध्या राष्ट्रवादीचे माढा लोकसभेचे उमेदवार आहेत. परिचारक व शिंदे यांची दोस्ती ही सर्वश्रुत आहे. शिंदे हे राष्ट्रवादीत गेले असले तरी परिचारक व त्यांच्या अन्य महाआघाडीच्या नेत्यांनी भाजपमध्ये राहणे पसंत केले आहे. 

रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये आले आहेत़ ते उमेदवार नसले तरी भाजपसाठी काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोहिते-पाटील व परिचारक यांना एकत्र काम करण्यासाठी आग्रह केला़ यातून विधानसभेला येथील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

मोहिते-पाटील अन् परिचारक यांच्यात चर्चा- रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी रविवारी पंढरपूर बाजार समितीमधील हॉलमध्ये परिचारकांसमोर पुन्हा मैत्रीचा हात पुढे केला. त्यांनी पंतांचे आशीर्वाद घेतले. याच बाजार समितीच्या आवारात २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी परिचारक समर्थकांनी मोहिते-पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. यानंतर १० वर्षांनी आता पुन्हा याच बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेवेळी मोहिते-पाटील व परिचारक यांच्यात मनोमिलन झाले, हा योगायोग म्हणावा लागेल़ त्यानंतर सोमवारी सकाळी खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पंढरीत येऊन सुधाकरपंत परिचारक यांची भेट घेतली व त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. यावेळी उमेश परिचारक, वसंतराव देशमुख उपस्थित होते़ 

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-pcमाधाVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलPrashant Paricharakप्रशांत परिचारकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस