वाळू वाहतुकीने घेतला युवकाचा बळी

By Admin | Updated: July 30, 2014 01:22 IST2014-07-30T01:22:09+5:302014-07-30T01:22:09+5:30

बाळे क्रॉस रोडवरील घटना : एक जखमी

The victim of youth was taken by sand transport | वाळू वाहतुकीने घेतला युवकाचा बळी

वाळू वाहतुकीने घेतला युवकाचा बळी


सोलापूर : वाळूने भरलेल्या टिप्परने मोटरसायकलला पाठीमागून जोरदारपणे धडक दिल्याने विनोद मनोहर चव्हाण (वय २७, रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) हा गंभीर जखमी होऊन मरण पावला. मंगळवारी दुपारी दीड वाजता बाळे क्रॉस रोडवर हा अपघात झाला.
विनोद हा आपली आई शांताबाई हिला घेऊन एमएच-१३/बीए-५९२७ या मोटरसायकलवरून बाळीवेस येथील शहा हॉस्पिटलकडे निघाला होता. बाळे क्रॉस रोडवर पाठीमागून येणाऱ्या वाळूच्या टिप्परने (क्रमांक- एमएच-१३/एएक्स-३०२३) त्याला जोरदार धडक दिली. त्यात विनोद आणि त्याची बहीण हे दोघे गंभीर जखमी झाले. या धडकेत टिप्परने शांताबाईला फरफटत नेले. उपचारासाठी दोघांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता विनोद हा उपचारापूर्वीच मरण पावला. अपघात घडल्यानंतरही टिप्परचालक न थांबता तेथून पळून गेला. याप्रकरणी पांडुरंग भीमा राठोड (वय ४२, रा. कोंडी) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, टिप्परचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक साळुंके करीत आहेत.
--------------------------
वाळूच्या गाड्या सुटतात बेभान
वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही. महसूल खातेही मूग गिळून गप्प आहे. या गाड्यांचा वेग इतका असता की कधी-काय अपघात होईल याचा नेम नाही. त्याचा प्रत्यय या अपघाताने आला. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांनी वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

Web Title: The victim of youth was taken by sand transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.