शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

विकी गायकवाड खुन प्रकरण; अडीच महिन्यांपासून कुर्डूवाडीत सुरू होती धगधग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:04 IST

व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकवरचे स्टेटस देत होते इशारे

ठळक मुद्देदोन गटातील संघर्ष अधिक तीव्रअंतर्गत वातावरण धगधगायला लागले

गोपालकृष्ण मांडवकरकुर्डूवाडी : माढा तालुक्यातील २५ हजार लोकसंख्येचे कुर्डूवाडी गाव विक्की गायकवाड या तरुणाच्या हत्येनंतर नव्याने चर्चेत आले आहे. एरव्ही नाकापुढचे सरळ जीवनमान कंठणाºया या गावातील सामंजस्याच्या वातावरणात विक्की गायकवाडच्या खुनामुळे तरंग उठले असले तरी वरवर शांत भासणाºया कुर्डूवाडीतील अंतस्थ आग या खुनानंतरही शमेल काय, याचे उत्तर येणारा काळच देऊ शकणार आहे. 

मृत विक्की गायकवाड हा मूळचा माळशिरसचा. मात्र मागील अनेक दिवसांपासून तो कुर्डूवाडीतील त्याचे मेहुणे अमर माने यांच्याकडे राहत होता. अमर माने यांचे कुर्डूवाडीत राजकीय वजन आहे. नगरपालिकेच्या स्थानिक राजकारणासोबतच पक्षीय राजकारणातही त्यांची ऊठबस आहे. राजकारणातील स्पर्धेत जवळच्यांची साथ हवी असते. २४ वर्षांचा विक्की मागील काही दिवसांपासून आपल्या मेहुण्यांच्या मदतीसाठी आणि एमपीएससीच्या अभ्यासासाठी कुर्डूवाडीतच राहायला आला होता. 

१७ जूनला झालेल्या खुनीहल्ल्यात विक्की गायकवाडची हत्या  (पान १ वरून) झाली. विक्की हा मूळचा कुर्डूवाडीचा नसल्याने स्थानिक पातळीवर या हत्येचे गंभीर पडसाद उमटलेले दिसत नाहीत. असे असले तरी स्थानिक पातळीवरील राजकारणातील सत्तासंघर्षातून आणि वर्चस्ववादातून ही हत्या घडली, हे मात्र तेवढेच खरे आहे. यामुळेच भविष्यात येथील वातावरण गढूळ होण्याचा धोका अधिक वाढला आहे.

९ एप्रिल २०१८ रोजी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यामध्ये शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान अमर माने यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली होती. नेमक्या या मुद्यावरून बैठकीनंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलिसांसमक्ष अमर माने आणि माणिक श्रीरामे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. या वादात विक्की गायकवाडही सहभागी होता. एकमेकांना पाहून घेण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. नेमक्या याच दिवशी सायंकाळी माणिक श्रीरामे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. माणिक श्रीरामे दोन दिवस बेशुद्धावस्थेत होते.

या घटनेत पोलिसांनी विक्की गायकवाड, अमर माने, त्यांचा भाऊ संतोष माने, अशफाक तौफिक आणि रवी आठवले यांच्यासह पाच जणांवर ३०७ अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली होती. त्यातील फरार असलेल्या रवी आठवले याला गुरुवारी २१ जूनला दुपारी पोलिसांनी अटक केली. केवळ विक्की आणि संतोष माने वगळता इतरांना जामीन न मिळाल्याने आजही सर्व जण कारागृहातच आहेत.

माणिक श्रीरामे यांच्यावर झालेल्या ९ एप्रिलच्या हल्ल्यापासूनच या दोन गटातील संघर्ष अधिक तीव्र झाला होता. अंतर्गत वातावरण धगधगायला लागले होते. श्रीरामे समर्थक असलेल्या काही तरुणांच्या एम.एस. नावाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचे स्टेटसही बदलले होते. ‘नाद करायचा नाय’, ‘नाद करा की राव, पण आमचा कुठं?’ असे स्टेटस असलेल्या या ग्रुपवरचे संदेशही तेवढेच भडक असायचे. एवढेच नाही तर, विक्कीच्या खुनातील आरोपी असलेल्या विनोद सोनवणे याच्या फेसबुकवरील पोस्टही मागील दोन महिन्यांत गर्भित इशारा देणाºया होत्या. या पोस्ट मागील दोन ते अडीच महिन्यांपासून सोशल मीडियावर फिरत होत्या. मात्र पोलिसांच्या सायबर सेलला आणि कुर्डूवाडीच्या ठाणेदारांना या बदललेल्या वातावरणाची दखल घेता आली नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल.

‘त्या’ घटनेतील पाचवा आरोपी अटकेत- ९ एप्रिलच्या सायंकाळी माणिक श्रीरामे यांच्यावरील हल्लाप्रकरणी  ३०७ चा गुन्हा दाखल असलेला रवी आठवले हा पाचवा आरोपी घटनेच्या तब्बल अडीच महिन्यांनंतर पोलिसांना सापडला आहे. गुरुवारी २१ जूनला अचानकपणे पोलिसांना हा फरार आरोपी सापडल्याने जनतेला आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयापुढे हजर करून २३ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. 

अमर मानेंचा जामिनासाठी अर्ज

  • - ९ एप्रिलला झालेल्या माणिक श्रीरामेवरील हल्लाप्रकरणी कारागृहात असलेले अमर माने यांनी न्यायालयाकडे        जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. या अर्जावर २१ जूनला सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळला. 
  • - माणिक श्रीरामे यांच्यावर झालेल्या ९ एप्रिलच्या हल्ल्यापासूनच या दोन गटातील संघर्ष अधिक तीव्र झाला होता.  श्रीरामे समर्थक असलेल्या काही तरुणांच्या एम.एस. नावाच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचे स्टेटसही बदलले होते.
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrimeगुन्हाPoliceपोलिस