शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

 आश्चर्यच की... ‘अहो! वारीत चक्क पैसा विकला जातोय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 12:23 IST

आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देआषाढी वारी सोहळा असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतातभाविक विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाला जाताना तुळशी आणि फुलांचे हार, प्रासादिक वस्तू, देवदेवतांचे फोटो खरेदी करतातएक, दोन ते पाच रुपयावरुन दुकानदार आणि भाविकांमध्ये वाद-विवाद होत आहेत़ केवळ सुट्ट्या पैशाच्या कारणामुळे

विलास मासाळ

पंढरपूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले आहेत़ भाविक कोणतीही वस्तू घेतल्यानंतर त्यांना सुटे पैसे देण्यासाठी व्यापाºयांना अडचण होते; मात्र  त्यांची सुटे पैशाची अडचण गोळ्या, बिस्किटे विकणारे मुले सुटे पैसे देऊन पूर्ण करतात. त्याबदल्यात ते १०० रुपयांवर १० रुपये कमिशन घेतात. हे पाहून सोपान सोळंके हे वारकरी म्हणाले, ‘अहो! वारीत चक्क पैसा विकला जातोय.. आश्चर्यच की़...

आषाढी वारी सोहळा असल्याने लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात़ हे भाविक विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाला जाताना तुळशी आणि फुलांचे हार, प्रासादिक वस्तू, देवदेवतांचे फोटो खरेदी करतात; मात्र त्यांनी १०० रुपये, २०० रुपये, ५०० रुपये किंवा २ हजार रुपयांची नोट काढली तर त्यांना सुटे पैसे देण्यासाठी व्यापाºयांची अडचण निर्माण होते, पण त्यांची अडचण याच परिसरातील मुले दूर करताना दिसून येतात. कारण ही मुले दर्शन रांगेत गोळ्या, बिस्किट विक्री करून किंवा गोपीचंद टिळा लावून रोज हजारो रुपयांची चिल्लर गोळा करतात आणि ते चिल्लर पैसे १०० रुपयांवर १० रुपये कमिशनने देतात.

१२ जुलै रोजी आषाढी वारी सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने गेल्या चार दिवसांपासून रेल्वे, एस़ टी़ आणि खासगी वाहनांनी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल होऊ लागले आहेत़ ज्या-त्या भागातील वारकरी आपापल्या महाराजांच्या मठात, धर्मशाळेत उतरत आहेत़ निवासाची सोय झाल्यानंतर वारकरी आपल्या लागणाºया अत्यावश्यक विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करताना दिसतात; मात्र एक, दोन ते पाच रुपयावरुन दुकानदार आणि भाविकांमध्ये वाद-विवाद होत आहेत़ केवळ सुट्ट्या पैशाच्या कारणामुळे असे प्रसंग उद्भवताना दिसून येतात.

दुकानात कितीही सुटे पैसे आणले तरीही ते पुरत नाहीत़ त्यामुळे सुट्ट्या पैशाची व्यापाºयांना अडचण निर्माण होते़ संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपातील दर्शन रांगेतील भाविकांना अनेक मुले गोळ्या, बिस्किट, चॉकलेट, पापडी, शेंगा, वटाणे आदी वस्तूंची विक्री करून एक रुपयांपासून ते १० रुपयांपर्यंतची क्वॉईन जमा करतात़ ही जमा झालेली चिल्लर व्यापाºयांना देतात पण १०० रुपयाला १० रुपये कमिशन घेतात़ म्हणजेच तो चक्क पैसे विकत असल्याचे दिसून येते़

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी