देशमुखवाडीतील जवानास अरूणाचल प्रदेशात आले वीरमरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:04 IST2019-01-03T15:54:10+5:302019-01-03T16:04:49+5:30

नातेपुते : माळशिरस तालुक्यातील देशमुखवाडी येथील जवानास अरूणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना वीरमरण आले. राजेंद्र सोमनाथ जगदाळे ( वय ३५ वर्ष ...

Veeramaran came to Arunachal Pradesh in Deshmukhwadi | देशमुखवाडीतील जवानास अरूणाचल प्रदेशात आले वीरमरण

देशमुखवाडीतील जवानास अरूणाचल प्रदेशात आले वीरमरण

ठळक मुद्देराजेंद्र जगदाळे हे अरूणाचल प्रदेश येथील तवांग येथे कार्यरत होत़े़राजेंद्र यांचे बालपण देशमुखवाडी गावातच गेले़ उद्या शुक्रवारी सकाळी पार्थिव देशमुखवाडीत येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबाकडून दिली

नातेपुते : माळशिरस तालुक्यातील देशमुखवाडी येथील जवानास अरूणाचल प्रदेशात कर्तव्यावर असताना वीरमरण आले. राजेंद्र सोमनाथ जगदाळे ( वय ३५ वर्ष  ) असे वीरमरण आलेल्या जवानांचे नाव आहे.

राजेंद्र जगदाळे हे अरूणाचल प्रदेश येथील तवांग येथे कार्यरत होत़े़. उद्या शुक्रवारी सकाळी पार्थिव देशमुखवाडीत येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबाकडून दिली.

राजेंद्र यांचे बालपण देशमुखवाडी गावातच गेले़ त्यांचे शिक्षण शिंदेवाडी येथील हनुमान विद्यालयात झाले़ वडील सदाशिवनगर येथील कारखान्यात कामाला होते़ राजेंद्रचे टर्निंग चालू असताना त्यांचे निधन झाले.  २१ जानेवारी २००३ रोजी तो आर्मीत दाखल झाला होता़ त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मोठा भाऊ, एक मुलगा, मुलगी असा आहे.

Web Title: Veeramaran came to Arunachal Pradesh in Deshmukhwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.