नगरपालिका प्रशासनात वीणा पवार रूजू; सरडे यांच्याकडे पुरवठा विभागाचा अतिरिक्त भार
By बाळकृष्ण दोड्डी | Updated: November 2, 2023 18:26 IST2023-11-02T18:03:44+5:302023-11-02T18:26:06+5:30
वर्षा लांडगे यांच्या बदलीनंतर त्यांचा पदभार शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला होता

नगरपालिका प्रशासनात वीणा पवार रूजू; सरडे यांच्याकडे पुरवठा विभागाचा अतिरिक्त भार
सोलापूर : जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील तांत्रिक अधिकारी संतोष सरडे यांच्याकडे देण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांच्या बदलीनंतर सदर पद रिक्त हाेते. तर लातूर महानगरपालिकेच्या उपायुक्त वीणा पवार यांची सोलापुरात बदली झाली असून त्या सोलापूर जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी पदावर रूजू झाल्या आहेत.
वर्षा लांडगे यांच्या बदलीनंतर त्यांचा पदभार शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. त्यांच्याकडचा अतिरिक्त कार्यभार संपुष्टात आणल्याची माहिती राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी अस्मिता पाटील यांनी त्यांच्या आदेशात दिली आहे. संतोष सरडे यांना सोलापूर पुरवठा विभागाचा अतिरिक्त कार्यभार त्वरित स्वीकारण्याची सूचना देखील त्यांनी केली आहे.