धनराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:34+5:302021-02-05T06:44:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क माढा : कुर्डुवाडी माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष धनराज दादा ...

Various activities on the occasion of Dhanraj Shinde's birthday | धनराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

धनराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क

माढा : कुर्डुवाडी माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष धनराज दादा शिंदे यांचा २६वा वाढदिवस माढा, करमाळा व पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

टेंभुर्णी येथील कन्या प्रशालेत वृक्षारोपण व सफाई कामगार महिलांना साडी वाटप करण्यात आले. गोविंद वृध्दाश्रम येथे फळे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर किल्ले पुरंदरची सायकलवारी केलेले युवक अमर सोपनर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

याबरोबरच माढा येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण, महिलांना साडी वाटप, तर कुर्डुवाडी येथे उम्मीद आश्रम येथे किराणा वाटप, के. एन. भिसे काॅलेज येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच टेंभुर्णी, माढा, कुर्डुवाडी, तांबवे, अंबाड, दहिवली, वरवडे, मिटकलवाडी, टाकळी (टें), उंबरे येथे वृक्षारोपण करण्यात आले. अंधत्व निवारण बहुद्देशीय संस्था, सोलापूर व आदित्य आई क्लिनिक लेजर्स सेंटर, डॉ. व्यंकटेश बोगा, सोलापूर यांच्याकडून उपळाई बु. येथे मोफत डोळे तपासणी करण्यात आली. या शिबिरात १५० लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १० रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. गरजूंना अल्पदरात चष्मा वाटप करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम आयोजित करण्यासाठी बेंबळे जिल्हा परिषद गटाचे सदस्य बंडूनाना ढवळे, टेंभुर्णीचे सरपंच प्रमोद कुटे, टेंभुर्णी गावचे ज्येष्ठ नेते परमेश्वर देशमुख, टेंभुर्णी शहर ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय मोरे, राजेंद्र केदार, कन्या प्रशालेचे पवार, अर्जुन खटके, शेडशिंगे गावचे माजी सरपंच महेश मारकड, गणेश तात्या बागल, सतीश थोरात, अमर शहा, केशव आवटे, सागर खटके, अमित शिंदे, अक्षय बागल, पप्पू बाबर, प्रतीक शिंदे. आकाश लांडगे, चेतन दिवटे, उत्तरेश्वर पवार, बंकट टिंगरे, विशाल इंगळे, गणेश पावसे, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे माढा तालुकाध्यक्ष संदीप गोरे, मनोज गायकवाड, संजय नागटिळक, सुधीर गायकवाड, संदीप गोरे, डॉ. धनेश माळी, प्रमोद वाकडे, विकास बेडगे, अविनाश तिपे, अजिनाथ तिपे, किरण दसंगे. सचिन बेडगे, संतोष रोमन, अक्षय गोरे आदींनी परिश्रम घेतले. (वा. प्र.)

....

फोटो : २७ माढा धनराज शिंदे

उपळाई (बु.) येथे धनराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डोळे तपासणी करण्यात आले.

Web Title: Various activities on the occasion of Dhanraj Shinde's birthday