टमटम उलटल्याने चालक ठार
By Admin | Updated: May 9, 2014 00:35 IST2014-05-07T23:02:44+5:302014-05-09T00:35:37+5:30
सोलापूर : मार्डीवरून देवदर्शन आटोपून परतत असताना टमटम उलटल्याने पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

टमटम उलटल्याने चालक ठार
सोलापूर : मार्डीवरून देवदर्शन आटोपून परतत असताना टमटम उलटल्याने पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
विठ्ठल बाळकृष्ण बोगा (वय ४५, रा. चाकोतेनगर, विडी घरकूल) हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी या जखमी झाल्या. हे दोघे देवदर्शनासाठी टमटममधून मार्डीला गेले होते. दुपारी चार वाजता दोघे दर्शन आटोपून परत निघाले. बाणेगावजवळ टमटम उलटली. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
गळफासाने इसमाची आत्महत्या
अज्ञात कारणावरून प्रभाकर तुकाराम तोग्गी (वय ४0, रा. उत्तर कसबा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी चार वाजता राहत्या घरी पत्र्याच्या वाश्याला त्यांनी टॉवेलने गळफास घेतला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.