शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

जिद्दी तरुणाचा अनोखा संघर्ष; लाॅकडाऊनमध्ये ड्रायव्हर गावाकडे आला अन्‌ गावकारभारी झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 1:14 PM

बाळेेवाडीच्या जिद्दी तरुणाचा अनोखा संघर्ष

नासीर कबीरकरमाळा : लॉकडाऊनने साऱ्यांचे जनजीवन विस्कळीत केले... अनेकांची रोजीरोटी बंद झाली. बाळेवाडीच्या नितीन लोंढेचेही अगदी तसेच काहीसे. पुण्यात ड्रायव्हर म्हणून कामाला. गावात मिळेल ते काम करून लोकांचा विश्वास संपादन केला. काहीवेळा संघर्षही झाला. तशातच निवडणूक आली. त्यात तो जिंकलाही अन्‌ आरक्षणात त्याला चक्क सरपंचपद अर्थात ‘गावकारभारी’ म्हणून सेवा करण्याची संधी चालून आली आहे.

 खरे तर लॉकडाऊनमध्ये नितीन हनुमंत लोंढे नावाचा युवक पुण्याहून बाळेवाडीला आला... पुण्यात एक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. गावात राहू लागला. चांगल्या स्वभावामुळे आणि गोड बोलण्यामुळे तो सर्वांत मिसळून गेला आणि नितीन गावाचा मित्र झाला. मिळेल ते काम करू लागला. शेतात उडीद, तुरी पेरल्या... चांगले उत्पादन मिळाले.

त्याला मंजूर झालेले रमाई घरकुल, घर बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे जुने घर पाडले; पण त्याच्या घरकुलाला तांत्रिक अडचण काढून मागच्या कारभारी लोकांनी अडवणूक केली. तरी त्याने जिद्द सोडली नाही. 

अशातच गावात निवडणूक लागली. दलित वस्तीने एकमुखाने नितीनच्या नावाची शिफारस केली. बाकी गावानेही सूचना मान्य केली. गावातून त्याच्याविरोधात कुणी अर्ज भरायला पुढे आले नाही. मग पुण्यातून एका त्याच्या भावकीतल्या माणसाला पटवून विरोधकांनी उभे केले. तरीही गडी मागे हटला नाही. तो प्रचार करत होता. गाठीभेटी घेत राहिला. जवळ पैसा नव्हता, कारण लॉकडाऊनमुळे तो गावी आला होता. प्रतिस्पर्धी पॅनलने पुण्याहून येणाऱ्या मतदारांना अनेक प्रलोभने दाखवली; पण सुग्रीव नलवडे आणि हर्षवर्धन नलवडे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याच्या स्वभावामुळे लोकांनी प्रतिस्पर्धी लोकांचे पैसे घेऊनही नितीन लोंढेलाच विजयी केले. सुदैवाने आरक्षण पडले आणि तो सरपंच झाला. आता तो गावकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झालाय. 

लोकांसाठी झटतोय अन्‌ झटणारहा माणूस कोणाची अडचण झाली तरी तो लोकांची अडवणूक करणारा नाही. तो शिकलेला आहे. त्याने जग पाहिलेय, त्याने विकास पाहिलाय. तो सगळ्यांना सोबत घेऊन गाव पुढे नेईल. तो गावाच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर झालाय. लोकशाहीच्या उत्सवात नितीन लोंढे सामील झाला. लोकांसाठी तो झटतोय, तो गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवणार यात शंका नाही, असा विश्वास लोकांमधून व्यक्त होऊ लागला आहे. 

 

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक